जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याकरिता विद्यार्थ्यांना हवी मुदत वाढ

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 22 January 2021

 जात पडताळणीचे मूळ प्रमाणपत्र सादर करण्याकरिता मुदत वाढ मिळण्याकरिता सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतीने बुधवार, ता.२० जानेवारी २०२१ रोजी समाजकल्याण अधिकारी, अकोला यांना निवेदन देण्यात आले.

अकोला :  जात पडताळणीचे मूळ प्रमाणपत्र सादर करण्याकरिता मुदत वाढ मिळण्याकरिता सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतीने बुधवार, ता.२० जानेवारी २०२१ रोजी समाजकल्याण अधिकारी, अकोला यांना निवेदन देण्यात आले.

ता. १६ जानेवारी २०२१ रोजी समाजकल्याण मार्फत जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पदवी आणि पदव्युत्तर उमेदवारांना २० जानेवारी २०२१ आपले मूळ जातपडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्याबाबत मुदत वाढवून दिली होती. मात्र अद्यापही समाजकल्याण मार्फत विद्यार्थ्यांना प्रमाणात मिळाले नाही, असे निदर्शनास आले.

हेही वाचा - कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन!

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळता यावे करिता समाजकल्याणने त्वरीत अध्यादेश काढून प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत किमान एका महिन्याने वाढविण्यात यावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली.

हेही वाचा - शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याचे माजी महासचिव इंजि.धीरज इंगळे व माजी संघटक आकाश गवई यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याचे माजी महासचिव प्रतुल विरघट, प्रशिस खंडारे, विक्की कांबळे, सोमेश दाभाडे, हर्षल शिरसाठ, अमन पळसपगार, धिरज म्हस्के, स्वरूप इंगोले, शेखर इंगळे, अंकुश धुरंधर, अंकित इंगळे तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Extension of time required for students to submit caste verification certificate