
कोरोना लसीकरणाचा एक डोज घेतल्यानंतर आरोग्य विभागातील दोन महिलांना सौम्य रिॲक्शन झाल्याची बाब रविवारी (ता. १७) समोर आली. दोन्ही महिलांवर स्थानिक सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन!, आरोग्य विभाग म्हणतोय घाबरण्याचे कारण नाही
अकोला : कोरोना लसीकरणाचा एक डोज घेतल्यानंतर आरोग्य विभागातील दोन महिलांना सौम्य रिॲक्शन झाल्याची बाब रविवारी (ता. १७) समोर आली. दोन्ही महिलांवर स्थानिक सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान कोणत्याची प्रकारच्या लसीकरणानंतर सौम्य रिॲक्शन येणे सामान्य असल्याचा दावा आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी केला असून अशा प्रकारच्या घटनांना न घाबरण्याचे आवाहन त्यांनी इतरांना केले आहे.
हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा
कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी शनिवारी (ता. १६) जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण करण्यात आले. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील २३८ कोरोना योद्ध्यांनी लस घेतली. परंतु काहींनी लसीकरणाला अनुत्साह दाखवला. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या दिवशी शंभर टक्के लसीकरण होऊ शकले नाही.
हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव
दरम्यान शनिवारी (ता. १६) कोरोनाची लस घेणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांना रविवारी (ता. १७) सौम्य रिॲक्शन झाले. एका महिलेला थंडी वाजून ताप आला, तर दुसरी महिला आशा वर्कर असून तिला थकवा जावणला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी आरोग्य विभागातील वरिष्ठांना माहिती दिली.
हेही वाचा - कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी
वरिष्ठांच्या आदेशाने दोन्ही महिलांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Web Title: Akola Marathi News Reaction Two Women After Corona Vaccination Health Department Says
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..