ग्रामपंचायत निवडणूक; १९२ ईव्हीएम निघणार गावांकडे!

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 14 January 2021

जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींचा सुद्धा समावेश आहे. या ग्रामपंचायतींसाठी मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) मतपत्रिका सील करण्याची प्रक्रिया सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात राबविण्यात आली. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
 

अकोला : जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींचा सुद्धा समावेश आहे. या ग्रामपंचायतींसाठी मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) मतपत्रिका सील करण्याची प्रक्रिया सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात राबविण्यात आली. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे गाव स्तरावर प्रचाराची रंगत वाढली असून उमेदवार गाठी भेटींवर भर देत आहेत.

हेही वाचा - ‘मुख्यमंत्री साहेब, पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या’, वाशिमच्या युवकाचं थेट मुख्यमंत्र्यांना भन्नाट पत्र

दुसरीकडे निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्वच प्रशासकीय बाबींची तयारी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयातील गोदामात अकोला तालुक्यामधील १६६ मतदान केंद्रांवर मतदानासाठी उपयोगात येणाऱ्या १६६ व २६ डबल बॅलेट यूनिट (ईव्हीएम मशीन) अशा एकूण १९२ मतदान यंत्रणांना सील करण्यात आले.

हेही वाचा - ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’, कान्हेरीच्या विठ्ठलाने शेतीलाच केले ‘पंढरी’​

त्यापूर्वी मतदान यंत्रांवर कर्मचाऱ्यांनी अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव व चिन्हाचा समावेश असलेल्या रंगीत मतपत्रिका ईव्हीएम मशीनवर चिटकवल्या. यावेळी बॅलेट व कंट्रोल यूनिटला सील करुन सुरक्षित ठेवण्यात आले. सदर प्रक्रियेसाठी १८ टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ७२ कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मशीन सील करण्याची कार्यावाही केली.

हेही वाचा - पुन्हा बलात्काराने हादरला महाराष्ट्र, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्येच केला बलात्कार

दृष्टीक्षेप अकोला तालुक्याच्या स्थितीवर!
- निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती - ३६
- निवडणूक होत असलेल्या जागा - ३३५
- निवडणूक होत असेलेले प्रभाग - १२८

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News- Gram Panchayat Election; 192 EVMs to go to villages!