esakal | मतदार यादीत २६ हजार मतदारांचे छायाचित्र नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Gram Panchayat Election Voter List does not have photographs of 26,000 voters

  अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत २६ हजार ५८७ मतदारांचे छायाचित्र नसल्याची बाब समोर आली आहे. अशा मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्रांवर, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मतदार यादीत २६ हजार मतदारांचे छायाचित्र नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत २६ हजार ५८७ मतदारांचे छायाचित्र नसल्याची बाब समोर आली आहे. अशा मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्रांवर, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तरी ज्या मतदारांच्या नावापुढे छायाचित्र नसेल त्यांनी दोन दिवसांच्या आत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे छायचित्रे जमा करावीत, अन्यथा सद नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.

 

हेही वाचागोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र नसणे, मतदार ओळखपत्र क्रमांक नसणे अशा मतदारांची छायाचित्रे घेऊन मतदार यादी अद्यावत करावी व जे मतदार त्या भागात रहात नाहीत किंवा आढळून येत नाहीत त्यांच्याबाबत रितसर नावे वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन यादी अद्यावत केली आहे.

हेही वाचागावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

याअंतर्गत अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघात २६ हजार ५८७ मतदार असे आहेत ज्यांचे छायाचित्र नाहीत. तथापी असे वगळ्यास पात्र असलेल्या मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्रावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी अशा मतदारांनी आपली छायाचित्रे येत्या दोन दिवसांत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना द्यावी, अन्यथा त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image