धुरडा उडणार, ग्रामपंचायत निवडणूकीत १ हजार १४४ मतदान यंत्र ठरविणार भाग्य

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 4 January 2021

 राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून प्रत्येक तालुक्यांमध्ये इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र (उमेवादवारी अर्ज) दाखल करत आहेत.

अकोला :  राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून प्रत्येक तालुक्यांमध्ये इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र (उमेवादवारी अर्ज) दाखल करत आहेत.

दरम्यान निवडणूक प्रक्रियेअंतर्गत मतदान प्रक्रियेशी संबंधित तयारीला सुद्धा वेग आला असून ग्रामपंचायत निवडणूक विभागाने मतदानासाठी कंट्रोल व बॅलेट यूनिटची संख्या निश्चित केली आहे. मतदानापूर्वी संबंधित तालुक्यांमधून मतदान पथकांना मतदान साहित्यांसह मतदान यंत्रांचे वाटप करण्यात येणार असून मतदानासाठी एक हजार १४४ मतदान यंत्रांची आवश्यकता लागणार आहे.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

राज्यासह जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-१९ ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. दरम्यान आता डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्याअंतर्गत राज्यातील सुमारे ४ जिल्ह्यांमधील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून आता प्रत्येक तालुक्यांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

९१३ मतदान केंद्र
निवडणूक होत असलेल्या २२५ ग्रामपंचायतींमध्ये मतदानासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांची निश्चिती केली आहे. त्याअतंर्गत तेल्हारा तालुक्यासाठी १५१, अकोटसाठी १३१, मूर्तिजापूरसाठी ११४, अकोला तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी १६७, बाळापूरसाठी १५४, बार्शीटाकळीसाठी १०२, पातूरसाठी ९४ असे जिल्ह्यासाठी ९१३ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

हेही वाचा - चला चला गर्दी करा, निवडणूकीसाठी अर्ज भरा! शेवटच्या दिवशी उमेदवारीसाठी तुंबळ गर्दी

मतदानासाठी आवश्यक यंत्र

तालुका ग्रा.पं. संख्या कंट्रोल युनिट बॅलेट युनिट
तेल्हारा ३४ १८९ १८९
अकोट ३८ १६४ १६४
मूर्तिजापूर २९ १४३ १४३
अकोला ३६ २०९ २०९
बाळापूर ३८ १९३ १९३
बार्शीटाकळी २७ १२८ १२८
पातूर २३ ११८ ११८
एकूण २२५ ११४४ ११४४

 

(संपादन - विवेक मेतकर)

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Gram Panchayat elections will require 21 thousand 144 voting machines