चला चला गर्दी करा, निवडणूकीसाठी अर्ज भरा! शेवटच्या दिवशी उमेदवारीसाठी तुंबळ गर्दी

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 31 December 2020

 जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीई बुधवारी (ता. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ऑनलाइनसोबतच ऑफलाइनही अर्ज स्वीकारण्यात आल्याने जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयावर गर्दी उसळली होती.

अकोला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीई बुधवारी (ता. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ऑनलाइनसोबतच ऑफलाइनही अर्ज स्वीकारण्यात आल्याने जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयावर गर्दी उसळली होती.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींपैकी २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

त्याअंतर्गत संंबंधित ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारलीय.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत एकूण ३ हजार ६२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यची प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी ५.३० पर्यंत उमेदवारी अर्ज ऑफलाइन स्वीकारल्याने अनेक इच्छुकांना दिलासा मिळाला.

हेही वाचा -  अलास्का, युरोप, अफ्रिकेमधुन आले विदेशी पाहुणे

आज होणार छाननी
उमेदवारी अर्जांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल.

(संपादन - विवेक मेतकर)

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News huge crowd on the last day for filing nomination papers for the Gram Panchayat elections