esakal | जीव धोक्यात, उड्डाण पुलाच्या सिमेंट ब्लॉकला गेले तडे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Life is in danger, the cement block of the flyover has been blocked

पुलाचे काम गेली कित्येक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने रस्ते अरुंद व खराब झाल्यामुळे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीला सिमेंट ब्लॉक लावले आहे. त्यांना तडे गेले आहे.

जीव धोक्यात, उड्डाण पुलाच्या सिमेंट ब्लॉकला गेले तडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  शहरातील डाबकी रोड रेल्वे गेटवर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. काम सुरू असतानाच सिमेट ब्लॉकला तडे जात असल्याने नागरिकांच्या जिवितास धोका आहे.

पुलाचे काम गेली कित्येक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने रस्ते अरुंद व खराब झाल्यामुळे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीला सिमेंट ब्लॉक लावले आहे. त्यांना तडे गेले आहे.

हेही वाचा - भाजपचे आमदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेने केला ‘गेम’

काही ठिकाणी सिमेंट लावून भेगा भरण्याच्या केविलवाणा प्रकार ठेकेदारांच्या वतीने करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पूल सुरू होण्याआधीच पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.

हेही वाचा -  गुपचूप हलवले जात होते शासकीय कार्यालय, भाजप, प्रहारचे कार्यकर्त्यांनी वाचा काय केले

शहरातील रस्त्यासारखी अवस्था न व्हावी यासाठी उड्डाणपुलाच्या कामाकडे कर्त्यव दक्ष जागरूक जनप्रतिनिधीनी तसेच बांधकाम विभाग अकोला यांनी तत्काळ लक्ष देऊन संभाव्य धोका ओळखावा. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेस आळा घालता येईल. त्यासाठी तत्काळ दखल घेण्याची मागणी डॉ. अशोक ओळंबे, अध्यक्ष महानगर सुधार कृती समिती, अखिल भारतीय ग्राहक पंचायतटे संघटनमंत्री हेमंत जकाते यांनी नागरिकांच्या वतीने एका पत्रकाद्वारे केली आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)