
जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची कमी दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
रिसोड (जि.वाशीम): जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची कमी दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन या मुख्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
काही शेतकऱ्यांनी ९३०५ या नवीन व लवकर येणाऱ्या वानाची लागवड केली होती.
हेही वाचा -नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं
ही सोयाबीन पावसापूर्वी हाती आल्यामुळे ९३०५ या वानाला बियाण्यासाठी मोठी मागणी आहे. काही बियाणे कंपन्या ही सोयाबीन पुढील वर्षीच्या बियाणाकरिता खरेदी करत असल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे. रविवारी (ता.२४) स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीनला तीन हजार ६९० ते चार हाजार ३८० रूपये दराने भाव मिळाला.
हेही वाचा -आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!
वाशीम येथील बाजार समितीमध्ये चार हजार ते चार हजार ५०१ रूपये दराने भाव होता. त्याचप्रमाणे ९३०५ या वानाला चार हजार ५०० ते पाच हजार २०० या दरम्यान भाव मिळाला होता.
येथील बाजार समितीमध्ये याच वानाच्या सोयाबीनला सुद्धा चार हजार ३८० रूपये एवढाच भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत याठिकाणी एवढा भाव कमी का? असाही प्रश्न काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर
आधीच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता या सुलतानी संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. वाशीम येथील बाजार समिती प्रमाणे ९३०५ या वाणाची वेगळी खरेदी करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा -बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा!, हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय
पावसामुळे यंदा सोयाबीनची प्रत खराब झाली आहे. त्यामुळे सर्व सोयाबीनला एक सारखाच भाव मिळत नाही. याबाबत एकाही शेतकऱ्याची तक्रार आमच्याकडे नाही. लवकरच खरेदीदारांची सभा बोलावून यावर चर्चा केल्या जाईल.
-विजयराव देशमुख, सचिव, कृउबास रिसोड.
(संपादन - विवेक मेतकर)