पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी आधी स्वतःला लस टोचून घ्यावी, त्यानंतर मी लस टाेचून घेईल- ॲड. प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 18 January 2021

देशात कोरोना लसीकरण मोहिमेला शनिवारी (ता. १६) सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र माेदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काेराेना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदाेउदाे करत आहेत. जुन्या काळात शिकारी शिकार करण्यासाठी जंगलभर ढाेल बडवित फिरत हाेते, तसाच काहीसा हा प्रकार असल्याची टिका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

अकोला : देशात कोरोना लसीकरण मोहिमेला शनिवारी (ता. १६) सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र माेदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काेराेना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदाेउदाे करत आहेत. जुन्या काळात शिकारी शिकार करण्यासाठी जंगलभर ढाेल बडवित फिरत हाेते, तसाच काहीसा हा प्रकार असल्याची टिका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

देशात कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर लसीकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत भाष्य केले.

हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

पंतप्रधान नरेंद्र माेदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला लस का टाेचून घेतली नाही, याचा त्यांनी खुलासा करावा. लसीबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर हाेण्यासाठी कराेना याेद्धे असलेले पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:ला लस टाेचून घ्यावी; त्यानंतर मी लस टाेचून घेईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

पंतप्रधान व मुख्यमंत्री हे स्वत:ला केव्हा टाेचून घेणार याची तारीखच त्यांनी जाहीर करावी. दाेघांनीही लस टाेचून घेत असल्याचे प्रक्षेपण माध्यमांद्वारे करण्यात यावे. असे केल्यासच सामान्यांचा लसीवरील विश्वास निर्माण हाेईल, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले. पत्रकार परिषदेला वंचितचे भारिप-बमंसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे, जि.प.चे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने व इतरांची उपस्थिती होती.

हेही वाचा - कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी

नामांतरणाचे नाटक पाच वर्ष चालणार
औरंगाबाद शहरासह राज्यातील अन्य शहरांच्या नामांतरावरुन वंचितचे नेते ॲड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. शिवसेना नामकरणाच्या बाजूने असून, कॉंग्रेसचा विराेध आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रकरणी अलिप्त आहे. त्यामुळे हे नाटक पाच वर्ष चालेल असा विश्वास ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News-Prime Minister, why the Chief Minister has not vaccinated himself before- Adv. Prakash Ambedkar