
येथील आमदार हरीश पिंपळे यांना दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी बुधवारी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.
मूर्तिजापूर (जि.अकोला) : येथील आमदार हरीश पिंपळे यांना दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी बुधवारी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.
तीन दिवसांपासून आपल्या घरातच असलेले आमदार हरीश पिंपळे यांना कोरोना झाल्याची लक्षणे वाटत असल्याने त्यांनी आपली येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात तातडीने रॅपिड अॅन्टीजन चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
हेही वाचा - ‘आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’
पुढील उपचारासाठी त्यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालय गाठले असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने विविध चाचण्या करून त्यांनी दिलेल्या सल्ल्याने प्रमाणे आपण पुढील उपाय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर गत ५-६ दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेऊन आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला
जवळच्या नातेवाईक, कर्मचाऱ्यांची चाचणी
आमदार पिंपळे यांच्या नित्याने संपर्कात येणारे त्यांचे स्वीय सहायक, कार्यालयीन कर्मचारी, कार्यकर्ते व परिवारातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता बळावली आहे. याची काळजी घेत सर्वच जवळच्या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करून घेतली असून, त्याचे अहवाल दोन दिवसात प्राप्त होण्याची शक्यता आहे.
(संपादन - विवेक मेतकर)