जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या भेटीत अधिकारी, कर्मचारी गैरहजर

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 21 January 2021

बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये अकोला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांनी बुधवारी आकस्मिक भेट दिली. तालुक्यातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी, प्राथमिक आरोग्य केंद्र महान, लघुपाटबंधारे विभाग बार्शीटाकळी आदी विविध कार्यालयात भेट देऊन पाहणी केली असता अधिकारी, कर्मचारी गैरहजर आढळले.

बार्शीटाकळी (जि.अकोला) : बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये अकोला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांनी बुधवारी आकस्मिक भेट दिली.

तालुक्यातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी, प्राथमिक आरोग्य केंद्र महान, लघुपाटबंधारे विभाग बार्शीटाकळी आदी विविध कार्यालयात भेट देऊन पाहणी केली असता अधिकारी, कर्मचारी गैरहजर आढळले.

हेही वाचा - पोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’

जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेसह इतर सेवा ठप्प असल्याचे आणि सकाळी ११ वाजेपर्यंत कार्यालयात कोणीही उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार उपाध्यक्षांच्या भेटीत दिलून आला. जिल्हा परिषद अंतर्गत येणारे तालुक्यातील इतर कार्यालयांचे व शाळांचे काय हाल असेल याबाबत आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा -  राज्य शासनाच्या आदेशाने महानगरपालिकेतील तीन वर्षातील ठराव गोळा करण्याची लगबग सुरू

पंचयात समिती हे ग्रामीण विभागाची महत्त्वपूर्ण कार्यालय समजले जाते. तालुक्यातून अनेक नागरिक कामानिमित कर्तालायत येतात; परंतु अधिकारी कर्मचारी गैरहजर राहत असल्याने नगरिकना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर उपाध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता तक्रारीतील सत्य बाहेर आले. बार्शीटाकळी पंचायत समितीच्या कारभाराबाबत त्यांनी संतापही व्यक्त केला.

हेही वाचा - कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन!

बार्शीटाकळी येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार बुधवारी बार्शीटाकळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी, सरप महान पंचायत समिती कार्यालय बार्शीटाकळी लघुपाटबंधारे विभाग बार्शीटाकळी येथे भेट दिली. यावेळी कर्मचारी गैरहजर आढळून आलेत. अनेक कार्यालयाला कुलूप दिसून आले. परिसरात अस्वच्छता आढळून आली. अरोग्य विभागालासुद्धा कुलुप होते. शिक्षण विभागामध्ये सुद्धा कोणतेच कर्मचारी उपस्थित नव्हते. सदर बाब नियमानुसार योग्य नाही. याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल.
- सावित्रीबाई हिरासिंग राठोड, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Officers, staff absent in the meeting of Zilla Parishad Vice President