कोरोनामुळे एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 11 January 2021

 कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त एका रुग्णाचा खासगी रुग्णालयात रविवारी (ता. १०) मृत्यू झाला. याव्यतिरीत्क ४३ नवे रुग्ण आढळले. मृत रुग्ण चक्रधर कॉलनी, गुडधी रोड, अकोला येथील ४७ वर्षीय महिला होती. तिला ६ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
 

अकोला : कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त एका रुग्णाचा खासगी रुग्णालयात रविवारी (ता. १०) मृत्यू झाला. याव्यतिरीत्क ४३ नवे रुग्ण आढळले. मृत रुग्ण चक्रधर कॉलनी, गुडधी रोड, अकोला येथील ४७ वर्षीय महिला होती. तिला ६ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. १०) ५२१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४७८ अहवाल निगेटिव्ह तर ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १४ महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प येथील तीन, डाबकी रोड, मलकापूर, जठारपेठ व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जांभा ता. मूर्तिजापूर, रचना कॉलनी, मरोदा ता. अकोट, पीकेव्ही, राधे नगर, न्यू तापडीया नगर, कृषी नगर, भीम नगर, जुने शहर, अकोट, छोटी उमरी, खडकी, आर.के. प्लॉट, गीता नगर, गोरक्षण रोड, तांदाली बु. ता. पातूर, सहारा नगर, कैलास नगर, बिर्ला गेट, गौतम नगर, अशोक नगर, आदर्श कॉलनी, व्हिएचबी कॉलनी, दक्षता नगर, कौलखेड, पातूर, दीपक चौक, सिलोदा व रामदासपेठ येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे. सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश असून ते लाडेगाव ता. अकोट, जलतारे प्लॉट व देवरी ता. अकोट येथील रहिवाशी आहे.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

१९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून रविवारी (ता. १०) सात, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, अकोला अक्सीडेंट येथून दोन, अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १०९१४
- मृत - ३२४
- डिस्चार्ज - ९९७३
- ॲक्टिव्ह रुग्ण - ६१७

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News One dies due to corona; 43 new positives