esakal | कोरोनामुळे आज एकाचा मृत्यू, ६५ पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News One dies today due to corona, 65 positive

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ४२६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३६१ अहवाल निगेटीव्ह तर ६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. एका रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, १०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे आज एकाचा मृत्यू, ६५ पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ४२६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३६१ अहवाल निगेटीव्ह तर ६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. एका रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, १०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


गुरुवारी दिवसभरात ४२६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी ६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात त्यातील गोरक्षण रोड येथील आठ, मुर्तिजापूर येथील सहा, अकोट येथील पाच, मोठी उमरी, न्यू तापडीया नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, बार्शीटाकळी, कौलखेड, बाळापूर, पातूर, सिंधी कॅम्प, आयडीबीआय बँकसमोर, गड्डम प्लॉट व बाळापूर नाका येथील प्रत्येकी दोन,

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

तर उर्वरित मांजरी, आदर्श कॉलनी, गोकूल नगर, जीएमसी हॉस्टेल, जीएमसी कर्मचारी, डाबकी रोड, जठारपेठ, कुंभारी, म्हातोडी, गुरुदेव नगर, अंबिका नगर, हिवरखेड, मलकापूर, गीता नगर, माना, कुरुम ता.मुर्तिजापूर, कांजरा ता.मुर्तिजापूर, परिवार कॉलनी, रणपिसे नगर, जीएमसी व अडगाव खुर्द ता. अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३, ओझोन हॉस्पिटल येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक तर होम आयसोलेशन येथून ८३ असे एकूण १०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दुपारनंतर अडगाव बु. हिवरखेड ता. तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास ता. ७ रोजी दाखल करण्यात आले होते.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

loading image