Akola Marathi News Organic Farming Purchase, Sales Corporation Job fraudulent advertising
Akola Marathi News Organic Farming Purchase, Sales Corporation Job fraudulent advertising

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सावधान!   ६७ हजार जागांची निघाली आहे फसवी जाहिरात

अकोला : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सावधान!  ‘सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या.’ या नावे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय यांचेकडे नोंदणी असलेल्या संस्थेद्वारे राज्यस्तरावरून मोठ्या प्रमाणावर विविध पदे भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

या जाहिरातीमध्ये दिलेल्या तपशीलावरून ही जाहिरात फसवी असून, राज्यातील सुशिक्षित तरुणांना प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे,असे कृषी आयुक्तालय पुणे यांनी कळविले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, याबाबत कृषी आयुक्तालयास तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संबंधितांशी कृषी आयुक्तालयस्तरावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित व्यक्तीस सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

एवढंच काय तर, महामंडळाचा स्थायी पत्ता व इतर माहिती विचारली असता संबंधित व्यक्तीने फोन वरील संभाषणमध्येच बंद करून फोन बंद केला. त्यानंतरही त्यांनी सर्व फोन बंद करून ठेवलेले असल्याने त्यांचेशी संपर्क होऊ शकत नाही. त्यांना ईमेलव्दारे माहिती विचारण्यात आली असून, अद्याप ईमेलला देखील उत्तर दिलेले नाही.

यासोबतच संबंधित संस्थेच्या जाहिरातीत अथवा संकेतस्थळावर मुख्यालयाचा पत्ता नाही. जाहिरातीमध्ये एकूण ६७ हजार ८१३ पदांची भरती करणार असल्याचे प्रलोभन दाखविण्यात आलेले आहे.

अर्ज भरणेकरिता शुल्क देखील आकारण्यात आले आहे. सर्व पदांचे वर्षाचे फक्त मानधनच ९७५ कोटी रुपये एवढे होते. सेंद्रिय शेतमालाची खरेदी व विक्री करण्यासाठी एवढा मानधनावर खर्च करणे निश्चितच व्यावहारिकदृष्टया संयुक्तिक नाही.

त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ‘सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या’ या संस्थेचा आणि केंद्र/राज्य शासनाचा अथवा शासन अंगीकृत महामंडळांशी कोणताही संबंध नाही. तरी अशा फसव्या जाहिरातीस तरुणांनी बळी पडू नये, असे आवाहन कृषी आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे ही आवाहन
अकोला येथिल डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व मिशनशी संबंधित सर्व संस्थांचा कोणताही संबंध नाही, असे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे. ‘सेंद्रिय उत्पादने खरेदी व विक्री महामंडळ’व्दारा विविध पदांकरिता भरती प्रक्रियेची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदभरतीच्या जाहिरातीशी अन्वये स्थापित झालेल्या डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, अकोला व मिशनची संलग्नित असलेल्या सर्व संस्था यांचा कुठलाही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com