राशन हवे, तर गावापासून दोन किलोमीटर डोंगरावर चला!

मनोज भिवगडे
Tuesday, 26 January 2021

देश डिजिटल होत आहे...सर्व व्यवहार ऑनलाइन...कॅशलेस होत असताना आजही देशातील अनेक गावांपर्यंत नेट कनेक्टिव्हिटी पोहोचलीच नाही. असेच एक गाव अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आहे. अती दुर्गम भागात असलेल्या १०० टक्के आदिवासी पाचरण गावात रेंज पोहोचलीच नाही.

 

अकोला : देश डिजिटल होत आहे...सर्व व्यवहार ऑनलाइन...कॅशलेस होत असताना आजही देशातील अनेक गावांपर्यंत नेट कनेक्टिव्हिटी पोहोचलीच नाही. असेच एक गाव अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आहे. अती दुर्गम भागात असलेल्या १०० टक्के आदिवासी पाचरण गावात रेंज पोहोचलीच नाही.

हेही वाचा -नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं

त्यामुळे राशनचा अंगठा लावण्यासाठीही या गावातील नागरिकांना गावापासून दूर दोन किलोमीटर डोंगरावर चढावे लागत आहे.

हेही वाचा -आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आलेगाव-डोणगाव मार्गावर पूर्वेला ५ किलोमीटर अंतरावर पाचरण हे गाव आहे. गावात आंध जमातीचे आदिवासी राहतात. गावात १०० घरं आणि ७००-८०० लोकांची वस्ती. गावाजवळून राज्य महामार्गही गेला आहे. मात्र आजपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही.

हेही वाचा -शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर

गावात वीज पोहोचली, पण आजही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागते. पिण्याच्या पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही. वीज असून कोणत्याही कामात येत नाही. जग डिजिटल होत असताना पाचरण गावातील नागरिक मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करीत आहे.

हेही वाचा -आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!

शासनाने जेव्हापासून ऑनलाइन राशन देण्यास सुरुवात केली तेव्हापासून या गावातील लोकांना धान्य मिळविण्यासाठीही गावापासून दोन किलोमीटर लांब जाम गावाजवळच्या डोंगरावर जावे लागते. कारणही तसेच आहे. रा

हेही वाचा -बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा!, हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय

हा अंगठा इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तरच नोंदविल्या जातो. गावात तर रेंज येतच नाही. त्यामुळे डोंगरावर जेथे रेंज येते तेथे जाऊन राशन दुकानदार संचालक दर महिन्याला सर्वांचे अंगठे लावून घेतो. वृद्ध, महिला, मुलांना डोंगरापर्यंत पायपिट करावी लागते. येथील राशन दुकान चंद्रकला वामण जामकर यांच्या नावावर आहे.

हेही वाचा -अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!

दुसऱ्या दिवशी गावात आल्यानंतर सर्वांना धान्याचे वाटप होते. ही कसरत गेले कित्येक महिन्यांपासून पाचरण ग्रामस्थ करीत असताना शासन किंवा प्रशासनातील कोणाचेही त्याकडे लक्ष जावू नये याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाचरण हे गाव संपूर्ण आदिवासी ग्राम आहे. आंध जमातीचे नागरिक येथे राहतात. गावात कोणत्याही सुविधा नाहीत. इंटरनेट किंवा मोबाईलची रेंज येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना राशनसाठी गावापासून दोन किलोमीटर जाम गावाजवळील डोंगरावर जावे लागते. तेथे पहिल्या दिवशी नोंद करून दुसऱ्या दिवशी गावात राशन वितरित होते. ही समस्या अनेक महिन्यांपासून कायम आहे.
- विष्णू हांडे, शिक्षक, पाचरण

(संपादन - विवेक मेतकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Pachran tribal village in Patur taluka for ration