esakal | जनतेच्या सहकार्याने अयोध्येत साकारणार प्रभू रामाचे मंदिर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Prabhu Ramas temple to be built in Ayodhya with the cooperation of the people

अयोध्येत प्रभू रामाचे भव्य राम मंदिर निर्माण होण्याचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. लाखो रामभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या मंदिराच्या भव्य निर्मितीसाठी श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत विदर्भात निधी समर्पण, गृह संपर्क अभियान आयोजित करण्यात येत आहे.

जनतेच्या सहकार्याने अयोध्येत साकारणार प्रभू रामाचे मंदिर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : अयोध्येत प्रभू रामाचे भव्य राम मंदिर निर्माण होण्याचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. लाखो रामभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या मंदिराच्या भव्य निर्मितीसाठी श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत विदर्भात निधी समर्पण, गृह संपर्क अभियान आयोजित करण्यात येत आहे.

या माध्यमातून संपूर्ण विदर्भातील प्रत्येक कुटुंबाशी प्रत्यक्ष संपर्क साधून निधी समर्पण अभियान राबविण्यात येणार असून, सर्व राम भक्तांनी या उपक्रमास मोठ्या हृदयाने सहकार्य करावे, असे आवाहन विदर्भ प्रांत अभियान प्रमुख गोविंद शेंडे यांनी केले आहे.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

स्थानिय बी.आर. हायस्कूल येथे रविवारी (ता.१०) विहिपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंदिर निर्माण कार्य प्रारंभ झाले असून, देशातील ख्यातनाम अभियंते व निर्माण कंपन्यांचे तज्ञ मंदिराचा आराखडा बनवीत आहेत. हे मंदिर दगडांचे असून, प्रत्येक मजला तीनशे साठ फुटांचा असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट व लांबी ३६० फूट तथा रुंदी २३५ फूट राहणार असून यात सर्व आधुनिक व्यवस्था राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री

निधी संपर्क अभियानात कार्यकर्ते प्रत्येक नागरिकांशी संपर्क करून निधी संकलित करणार आहेत. यात दहा, शंभर, हजार रुपये संकलित करून तेवढ्या राशीचे कूपन व पावती देण्यात येणार आहे. या संदर्भात विदर्भ प्रांत समितीही गठित करण्यात आली आहे. समिती अध्यक्ष म्हणून देवनाथपिठेश्र्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज हे कामकाज बघणार असून, अभियान प्रमुखाची जबाबदारी गोविंद शेंडे यांचेवर सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

समितीत अकोला महानगराचे अभियान प्रमुख म्हणून प्रकाश घोगलिया, सहप्रमुख रुपेश शाह, सुनील कुरहेकर तथा ग्रामीण अभियान प्रमुख म्हणून संजय रोहनकर, सह प्रमुख म्हणून सुनील जाधव, ज्ञानेश्वर देशपांडे, गजानन रेलकर आदी कामकाज बघणार आहेत. राम भक्तांनी या संपर्क व निधी संपर्क अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या पत्रकार परिषद मध्ये संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, नगर संघचालक गोपाल खंडेलवाल, विहीपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढिया, महानगर अभियान प्रमुख प्रकाश घोगलिया, राहुल राठी, डॉ.प्रवीण चव्हाण, गणेश काळकर आदी उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image