esakal | नियम मोडला तर दंड होणारच, 73 हजार वाहनांनी भरला 72 लाखांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

If Akola Marathi News rules are broken, there will be a fine, 73 thousand vehicles have paid a fine of Rs 72 lakh

मावळत्या वर्षात शहर वाहतूक शाखेने कारवाईचे सर्व रिकॉर्ड मोडीत काढले. अकोल्यात वाहतूक शाखा अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंतच्या सर्वात जास्त कारवाया करताना तब्बल ७३ हजार ५०० वाहनांवर दंड आकारण्यात आला असून, त्यातून ७२ लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल प्राप्त केला आहे. कारवाईत अकोला शहर वाहतूक शाखा विभागात पहिल्या स्थानावर आहे.

नियम मोडला तर दंड होणारच, 73 हजार वाहनांनी भरला 72 लाखांचा दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मावळत्या वर्षात शहर वाहतूक शाखेने कारवाईचे सर्व रिकॉर्ड मोडीत काढले. अकोल्यात वाहतूक शाखा अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंतच्या सर्वात जास्त कारवाया करताना तब्बल ७३ हजार ५०० वाहनांवर दंड आकारण्यात आला असून, त्यातून ७२ लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल प्राप्त केला आहे. कारवाईत अकोला शहर वाहतूक शाखा विभागात पहिल्या स्थानावर आहे.


सन २०२० हे वर्ष कोरोना संकटाचे. त्यामुळे सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. पोलिसांवर तरच जास्तच ताण होता. त्यात कोला शहरात वर्षभर सुरू असलेल्या प्रमुख रस्त्याचे बांधकामे ,उड्डाण पूल या मुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक कर्मचाऱ्यांवरील ताण अधिकच वाढला होता. कोरोना संकटात स्वतःला जपत व इतरांच्या आरोग्याची काळजी घेत लॉकडाउन काळात सुद्धा शहर वाहतूक विभागाने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

या जबाबदाऱ्या पार पाडीत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके व पोलिस अंमलदार यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेत नियम तोडणाऱ्यांविरुद्ध रेकॉर्ड ब्रेक कारवाया केल्यात. अनेक सामाजिक उपक्रमही राबविले. त्यात करोना काळामुळे रक्ताची कमतरता लक्षात घेऊन पोलिस अंमलदार व कुटुंबीयांचा रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करून शासनाचे आवहनाला तत्काळ प्रतिसाद दिला. वर्षभर पोलिस अधीक्षकांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने धडक कारवाया व सामाजिक उपक्रम या दोन्ही आघाडीवर भरीव कामगिरी केली.

सामाजिक उपक्रम राबविण्यातही अग्रेसर
शहर वाहतूक शाखेने फक्त रिकॉर्ड ब्रेक कारवाया केल्या नसून, सरत्या वर्षात सामाजिक उपक्रम सुद्धा राबविले. ज्यामध्ये करोना लॉकडाउन काळात एकट्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एक कॉल करा, मदत मिळवा’ ही मोहीम यशस्वीरित्या राबविली. अनेकज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय मदत, वाहने, राशन, व आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली.

हेही वाचा -  हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी
 

ऑटो बंद असल्याने उपासमार होत असलेल्या काही आजारी व गरीब ऑटो चालकांना राशन वाटप केले. करोना वारीयर्स वॉल पेंटिंग स्पर्धा आयोजित करून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. करोना संक्रमण कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई सोबत सर्वसामान्य नागरिकां मध्ये जनजागृती करण्यासाठी नो मास्क नो फ्युएल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो डील, नो मास्क नो राशन, नो मास्क नो सवारी, नो मास्क नो राईड या मोहिमा यशस्वी पणे राबविल्या.

गतवर्षीपेक्षा १४ हजार अधिक कारवाया
शहर वाहतूक शाखेने मागील २०१९ यावर्षी ५९ हजार ५४० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यातुलनेत या वर्षी तब्बल १४ हजार कारवाया जास्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल
अकोला शहर वाहतूक शाखेने राबविलेल्या ‘नो मास्क नो सवारी’ या उपक्रमाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन कौतुक केले होते. ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्याविरुद्ध कारवाई
फटाके फोडणाऱ्या बुलेट गाड्या विरुद्ध विशेष मोहीम राबवून कडक कायदेशीर कारवाई सोबत सायलेन्सर बदलून घेऊन मगच गाड्या सोडून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली.

(संपादन - विवेक मेतकर)

 

 

loading image