
महसूल विभागाने धाड टाकून रेती जप्त केलेली रेती तहसील कार्यालयात न आणता शिपायाने घरी नेवून गाडी खाली केली. त्यावर तहसीलदार यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला असता जिल्हाधिकारी यांनी शिपायास निलंबित करण्याचा आदेश दिला.
तेल्हारा (जि.अकोला) : महसूल विभागाने धाड टाकून रेती जप्त केलेली रेती तहसील कार्यालयात न आणता शिपायाने घरी नेवून गाडी खाली केली. त्यावर तहसीलदार यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला असता जिल्हाधिकारी यांनी शिपायास निलंबित करण्याचा आदेश दिला.
तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठी यांनी धाड टाकून मोठ्या प्रमाणात रेती साठा जप्त केला होता. सदर रेती ही वाहनांनाव्दारे तहसील कार्यालयात आणण्याची प्रक्रिया सुरू असताना वाहन चालकासोबत बळीराम नरहरी वारूळकर या शिपायाला पाठविले.
या शिपायाने सदर वाहनात असलेली सहा ब्रास रेती तहसील कार्यालयात खाली न करता स्वतःच्या घराजवळ खाली केली.
वाहन चालकास तुला कोणी रेती कुठे खाली केली असे विचारले असता तहसीलमध्ये खाली केली असे सांगावे असे शिपायाने सांगितले.
हेही वाचा - शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे 25 कोटी रुपये! निधी तहसीलदारांच्या खात्यात जमा
त्यावर तहसीलदार राजेश गुरव यांनी जीपीएस लोकेशन घेऊन व चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी यांचे कडे पाठविला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बळीराम नरहरी वारूळकर या शिपायास निलंबित केले असल्याची माहिती तहसीलदार राजेश गुरव यांनी दिली.
(संपादन - विवेक मेतकर)