
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. सदर घटनेनंतर वैद्यकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.
अकोला : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. सदर घटनेनंतर वैद्यकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.
सदर घटनेमुळे रुग्णालयातील बालकांच्या सुरक्षेचा विषय चर्चेला आला असून स्थानिक जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग) उपचार घेत असलेले नवजात शिशु आगीसारख्या घटनेपासून सुरक्षित असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. नवजार शिशुंच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म सिस्टीमसह अग्निशामक यंत्र लावण्यात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये एसएनसीयू युनिट जळाल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अंगावर शहारे आणणारी असली तरी जिल्ह्यातील समान्य रुग्णालयांमध्ये असलेले बेबी केअर युनिट खरंच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच घटनेच्या आधारावर अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालय याच्या एसएनसीयूची माहिती घेतली असता, त्याठिकाणी फायर अलार्म सिस्टीम, अग्निशामक यंत्र, स्मोक डिटेक्टर लावण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त या रुग्णालयात नवजात शिशुंच्या सुरक्षेच्या सर्वच उपाययोजना करण्यात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री
रुग्णालयासह ‘एसएनसीयू’चे गत महिन्यातच फायर ऑडिट करण्यात आले असून इलेक्ट्रॉनिक ऑडिट सुद्धा करण्यात आले आहे. याव्यतिरीक्त रुग्णालयात आग लागल्यास करायच्या उपाययोजनांसंदर्भात कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी नियमित ‘मॉक ड्रिल’ सुद्धा करण्यात येते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच
कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
स्थानिक जिल्हा स्त्री रुग्णालयात आतापर्यंत कोणतीच छोटी किंवा मोठी घटना घडली नाही. परंतु आपत्कालीन स्थितीमध्ये अशी घटना घडल्यास एसएनसीयूमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वेळीच उपाययोजना करता याव्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा वेळोवेळी सराव सुद्धा करण्यात येतो.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
तीन युनिटमध्ये होते उपचार
जिल्हा स्त्री रुग्णालयात असलेल्या एसएनसीयूमध्ये तीन युनिट आहेत. इतर युनिटमध्ये दोन युनिट असून येथे स्त्री रुग्णालयातील रुग्णांना ठेवण्यात येते. आऊटर युनिटमध्ये एक युनिट आहे. या ठिकाणी बाहेरच्या नवजात बालकांवर उपचार करण्यात येतात. या युनिटमध्ये काम करणारे कर्मचारी व बालरोगतज्ञ लक्ष ठेवून आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)