शेतकऱ्यांभोवती आत्महत्येचा फास, १४० शेतकऱ्यांना गमवावा लागला जीव

Akola Marathi News Suicide trap around farmers, 140 farmers had to lose their lives
Akola Marathi News Suicide trap around farmers, 140 farmers had to lose their lives

अकोला : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आजचा २९ वा दिवस आहे. कृषी कायद्याचे फायदे पटवून देण्यात आणि शेतकऱ्यांचं समाधास करण्यास मोदी सरकारला आत्तापर्यंत यश आलेलं नाही. याच दरमान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांशी संवाद डिजिटल माध्यमाद्वारे संवाद साधत आंदोलकांच्या प्रश्नांना शेतकऱ्यांच्याच तोंडून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, असे असले तरी कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी मार्च २०२० पासून देशात लॉकडाउन करण्यात आले होते. आणि याच लॉकडाउनमध्ये कृषी निविष्ठा महागल्याने व नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांनी गारद केल्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांभोवती आत्महत्येचा फास आवळला असून, वर्षभरात तब्बल १४० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याचे दुर्दव्यी चित्र अकोला जिल्ह्यात आहे.

प्रशासन स्तरावर त्यांचेपैकी केवळ ७५ प्रकरणे पात्र ठरली असून, २८ प्रकरणे अपात्र व ३७ प्रकरणे पेंडीग आहेत.

यामुळे वाढल्या शेतकरी आत्महत्या
महागलेले बियाणे व कृषी निविष्ठा, उशिरा मॉन्सूनचे आगमण, पावसाचा दीर्घ खंड, सततधार पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वातावरणात वेळोवेळी बदल, कीडींचा व विषाणूजन्य आजारांचा पिकांवर प्रादुर्भाव, कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा हल्ला, मजुरांची मारामार, वाढलेली मजुरी, कोरोनाचे संकट, लॉकडाउनमुळे ढासळलेली शेतमाल विक्री व्यवस्था, बँकांनी नाकारलेले पीककर्ज, कर्जमुक्ती/कर्जमाफीचा अभाव, शासकीय शेतमाल खरेदीचा अभाव, रखडलेले चुकारे, व्यापाऱ्यांकडून लूट, बाजारात पडलेले भाव, बँका, सावकारांकडून कर्ज वसुलीचा तगादा व या सर्व संकटांमध्ये कुटुंबियांची होत असलेली कुचबिना यामुळे जिल्ह्यात यावर्षी शेतकरी आत्महत्या वाढल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक

शेतकरी आत्महत्या वाढण्यासाठी नैसर्गिक व अनैसर्गिक असे विविध कारणे आहेतच परंतु, शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सुद्धा कमी पडत आहे. शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रशासन स्तरावर स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी व लवकरात लवकर प्रकरणे निकाली काढावी.
- कृष्णा अंधारे, संयोजक, शेतकरी जागर मंच, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com