कौतुकास्पद; दहा वर्षांची ज्ञानेश्वरी करते कीर्तनातून प्रबोधन,गावातच घेतला गोरक्षाचा वसा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

येथील ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांची १० वर्षांची मुलगी ज्ञानेश्वरी शेटे ही बालकीर्तनकार म्हणून सध्या परिसरात गाजत आहे. तिला वडिलांकडून जणू कीर्तनाचा वारसा हक्क मिळाला आहे.

वरुर जवळका (जि.अकोला) : येथील ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांची १० वर्षांची मुलगी ज्ञानेश्वरी शेटे ही बालकीर्तनकार म्हणून सध्या परिसरात गाजत आहे. तिला वडिलांकडून जणू कीर्तनाचा वारसा हक्क मिळाला आहे.

लॉकडाउनच्या काळात तिने कीर्तनाचे धडे घेतले आणि अल्पावधीतच ती बालकीर्तनकार म्हणून उदयास आली. कीर्तनाच्या माध्यमातून तिला मिळणाऱ्या मानधनातून ती गोरक्षण संस्था चालवणार आहे.

हेही वाचा -नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं

कोरोना विषाणूमुळे झालेला लॉकडाउन काहींसाठी अडचणीचा तर काहींना वरदान ठरला. लॉकडाउनच्या काळात अवघ्या सहा महिन्यात ऑनलाईन बालसंस्कार शिबिर व काही संत मंडळींच्या मार्गदर्शनातून ज्ञानेश्वरी कीर्तनकार बनली. कीर्तनाचे धडे घेतल्यानंतर अल्पावधीतच तिचे राज्यभर कीर्तन सुरू झाले.

हेही वाचा -शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर

ती सर्वत्र कौतुकाचा विषय बनू लागली. या बालवयातही तिने कीर्तनाच्या माध्यमातून मिळणारे मानधन गोरक्षण संस्थेला देण्याचा मानस केला आहे. गावांमध्येच माऊली गोरक्षण संस्थेची निर्मिती करून तिला या संस्थेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

हेही वाचा -बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा!, हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय

विद्यार्थी दशेतच शिवचरित्र तोंडपाठ
ज्ञानेश्वरी दीदी म्हणून प्रसिद्ध झालेली बालकीर्तनकार विद्यार्थी दशेतच शिवचरित्र तोंडपाठ आहे. संतांच्या विचारांचा वारसा चालवीत कीर्तन करायला सुरुवात केली आहे. कीर्तनामध्ये तिची बोलण्याची शैली, गायन, वारकरी पावळ्या, अगदी सहज विनोदी शैलीत ती मांडते

हेही वाचा -आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!

.धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी तिचे कौतुक करत आहे. ती अकोटला गुड सेफर स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Ten year old Dnyaneshwari Ganesh Shete performs Prabodhan through Kirtan, took Goraksha fat in the village!