तीस वर्षांपासून रक्तपुरवठा करीत तरुणाला दिले जीवदान!

Akola Marathi News Thalassemia patient has been giving life to a young man by supplying blood for thirty years!
Akola Marathi News Thalassemia patient has been giving life to a young man by supplying blood for thirty years!

अकोला  :  थॅलेसिमेयिच्या रुग्णांसाठी रक्त हेच अमृत आहे. हे रक्तरुपी अमृत देवून एखाद्या मुलाला जीवदान देण्याचे काम एक-दोन वर्षे नव्हे तर रक्तपढीच्या स्थापनेपासून सातत्याने करण्यात येत आहे. सलग तीस वर्षांपासून अकोला रक्तपेढीतर्फे डॉ. के.के. अग्रवाल आणि डॉ. सौ. रेख अग्रवाल हे सामाजिक दायित्व जोपासत आल्या आहेत.


अकोला रक्तपेढीची स्थापन १९९० मध्ये झाली. त्यावेळी रक्तदानाबाबत फारशी जागृती नव्हती. अशा काळात अकोल्यासारख्या शहरात स्थापन झालेल्या अकोला रक्तपेढीतून अगदी स्थापनेपासून कुणाल बागडे या गरीब कुटुंबातील बालकाला अगदी मोफत रक्ताचा पुरवठा डॉ. अग्रवाल दाम्पत्याने केला. आज हा बालक ३५ वर्षांचा झाला आहे. अगदी रक्तपेढीच्या स्थापनेपासून त्याला आजपर्यंत सातत्याने रक्ताचा पुरवठा करण्याचे काम डॉक्टरांनी केले.

आजही तो निरोगी आयुष्य जगतो आहे. अकोला रक्तपेढीच्या स्थापनेला ३० वर्षे झाली. तेव्हापासून सातत्याने आजही डॉक्टर त्याच तळमळीने मदत करीत असल्याबद्दल कुणालने डॉक्टर दाम्पत्याने आभार मानले. केवळ रक्तपेढी हा व्यवसाय म्हणून न करता त्याच्याकडे सामाजिक दायित्व म्हणून बघणाऱ्या अग्रवाल दाम्पत्याने कोरोना काळातही नागरिकांना सेवा दिली. नवनवीन आव्हानांचा सामना करीत आजीह त्यांचे कार्य अखंडपणे सुरू आहे.

हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?
 
शासनाच्यापूर्वीपासून एचआयव्ही- एड्स बाबत जनजागृती
अकोला रक्तपेढीच्या संचालक डॉ. रेखा अग्रवाल या एचआयव्ही-एड्सबाबत जनजागृती करतात. शासनाकडून जनजागृतीचा उपक्रम सुरू करण्यापूर्वी डॉ. रेखा अग्रवाल यांनी या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून जागृती केली होती. आजपर्यंत त्यांचे हजारावर व्याख्यान या माध्यमातून झाले आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com