esakal | आजपासून प्रवाशांच्या सेवेत आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या, बुकिंगची सुविधा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- Three more special trains in passenger service from today

रेल प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी तीन अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, नागपूर-अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येतील. सदर गाड्या पूर्णतः आरक्षित असतील. त्यामुळे या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या गाड्यांची आरक्षण बुकिंग सोमवार (ता. १८) पासून सुरू होईल.

आजपासून प्रवाशांच्या सेवेत आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या, बुकिंगची सुविधा सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  रेल प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी तीन अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, नागपूर-अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येतील. सदर गाड्या पूर्णतः आरक्षित असतील. त्यामुळे या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या गाड्यांची आरक्षण बुकिंग सोमवार (ता. १८) पासून सुरू होईल.


रेल्वेने मुंबई-नागपूर दरम्यान विशेष गाडी दररोज चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०२१६९ डाऊन मुंबई-नागपूर विशेष गाडी दिनांक २१ जानेवारी पासून पुढील आदेशापर्यंत मुंबई येथून दररोज १४.५५ वाजता रवाना होईल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी ५.४५ वाजता पोहचेल.

हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

गाडी क्रमांक ०२१७० अप नागपूर-मुंबई विशेष गाडी दिनांक २० जानेवारी २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत नागपूर येथून दररोज २१.१० वाजता रवाना होईल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल. या गाडीला देवळाली, नाशिक, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा येथे थांबे देण्यात आले आहेत.

हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

नागपूर-अहमदाबाद विशेष गाडी साप्ताहिक
गाडी क्रमांक ०११३७ अप नागपूर-अहमदाबाद विशेष गाडी २० जानेवारी २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत नागपूर येथून प्रत्येक बुधवारी ८.१५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी अहमदाबादला ००.३५ वाचता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३८ डाउन अहमदाबाद-नागपूर विशेष गाडी २१ जानेवारी २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत अहमदाबाद येथून दर गुरुवारला १८.३० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला १०.२५ वाजता पोहचेल. सदर गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव येथे थांबे देण्यात आले आहेत.

हेही वाचा - कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी

नागपूर-पुणे सुपरफास्ट एसी विशेष गाडी
गाडी क्रमांक ०२११४ अप नागपूर-पुणे एसी विशेष गाडी १९ जानेवारी २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत नागपूर येथून दर मंगळवार, शुक्रवार, रविवार १८.०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पुणेला ०९.०५ वाचता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२११३ डाउन पुणे-नागपूर एससी विशेष गाडी २० जानेवारी २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पुणे येथून प्रत्येक बुधवार, शनिवार, सोमवार १७.४० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे ०९.१० वाचता पोहोचेल. सदर गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड येथे थांबे देण्यात आले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)