मतमोजणी निमित्त वाहतुकीत बदल, आज मद्यविक्री बंद

Akola Marathi News- Traffic changes due to counting of votes, sale of liquor closed today
Akola Marathi News- Traffic changes due to counting of votes, sale of liquor closed today

अकोला  : ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ ची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये सोमवारी (ता. १८) सकाळी ९ वाजतापासून सुरू होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरीता एचडीएफसी बँक ते सरकारी बगीच्या रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सोमवारी (ता. १८) सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत सदर मार्गावरील वाहतूक मार्गात बदल राहिल. त्यामुळे वाहन चालकांनी निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिस व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आज मद्यविक्री बंद
 जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. त्यानंतर सोमवारी (ता. १८) मतमोजणी होणार आहे. दरम्यान आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व निवडणुका कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच निवडणूका ह्या खुल्या व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हदीतील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे.

त्यानुसार अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे. त्याअंतर्गत मतमोजणीच्या दिवशी ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आहे व ज्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी आहे. त्या स्थानिक स्वराज्य सस्थांच्या हदीतील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com