
श्री गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये आबालवृद्धांचा समावेश आहे. यात तरुणीही मागे नाहीत. पायदळ वारी असो की, गुरुवारची वारी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. अशाच एका वारीत अकोट तालुक्यातील वरुर जऊळका येथून थेट शेगावपर्यंत श्रींची पालखी आपल्या खांद्यावर नेणाऱ्या दोन तरूणी सध्या भाविकांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.
अकोट (जि.अकोला) : श्री गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये आबालवृद्धांचा समावेश आहे. यात तरुणीही मागे नाहीत. पायदळ वारी असो की, गुरुवारची वारी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. अशाच एका वारीत अकोट तालुक्यातील वरुर जऊळका येथून थेट शेगावपर्यंत श्रींची पालखी आपल्या खांद्यावर नेणाऱ्या दोन तरूणी सध्या भाविकांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.
वरूर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थानच्या माध्यमातून महा क्षेत्र शेगाव येथे पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. या दिंडी सोहळ्याला परिसरातून वर्षानुवर्ष भरपूर प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी शासनाच्या नियम अटीचे पालन करून दिंडी सोहळ्याचे प्रस्थान ता.१३ फेब्रुवारी झाले. परिसरातील भाविक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.
हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी
यावर्षी दिंडी सोहळ्यात वेगळेपण दिसून आले. वरुर जऊळका येथील कु. वैष्णवी बुरघाटे व कु. पूजा बुरघाटे या दोन तरुणींमुळे. श्रींची ५० किलोची पालखी योग योगेश्वर संस्थान वरूर जऊळका येथून श्रीक्षेत्र शेगावपर्यंत तब्बल साठ किलोमीटर अंतर आपल्या खांद्यावर पालखी घेवून या तरुणींना पार केले. तब्बल ६० किलोमीटर अंतर पालखी खांद्यावर घेवून पार करणाऱ्या या भाविक तरुणींचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. शेगाव येथे गणेश महाराज शेटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने दिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी भानुदास बुरघाटे, सुभाष बुरघाटे, बबनराव खरड, बबन सपकाळ, प्रदीप पाटील बुरघाटे, अरुण पाटील बुरघाटे, राजेश बुरघाटे या वारकरी मंडळींचे मोलाचे सहकार्य मिळाले.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर
तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही
बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू