‘व्हॅलेंटाईन डे’ला युवकांचे आंदोलन, वाचा काय आहे प्रकार

Akola Marathi News Valentines Day agitation of farmer youth
Akola Marathi News Valentines Day agitation of farmer youth

अकोला  ः ‘आमचे शेतकरी माय-बाप हेच आमचे पहिले व्हॅलेंटाईन’ असून, त्यांचे व्हॅलेंटाईन त्यांची ‘शेती’ आहे. आज आमचे शेतकरी माय-बाप व त्यांची शेतीसुद्धा संकटात आहे आणि त्यांना वाचविण्यासाठी आम्ही १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे रोजी ‘सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन’ या मागणीसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत.


जगभरामध्ये जेव्हा तरुणाई प्रेमाचा उत्सव साजरा करत असेल तेव्हा शेतकरी जागर मंच त्यांच्या पहिल्या प्रेमाला (शेतकरी व शेती) वाचविण्यासाठी जीवापार धडपड करणार आहे. सर्व शेतकरी पुत्र रविवारी (ता.१४) अकोला शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून समस्त जनतेला त्यांचे प्रेम वाचविण्यासाठी त्यांनी सुद्धा आंदोलनजीवी व्हावं असं साकळं घालणार आहेत.

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात सर्व तरूण शेतकरी पुत्र जिल्हाधिकाऱ्यांना गुलाब पुष्प व ग्रिटिंग कार्ड देऊन त्यांच्या अडचणीची जाणीव करून देणार आहेत. सोबतच केंद्र सरकारने तयार केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे परत घेण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार असून, दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी पुत्र पोहचणार आहेत. या शांततापूर्ण व प्रेमाचे प्रतीक असलेल्या आंदोलनात तमाम शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी जागर मंचच्या वतीने यावेळी करण्यात आले. 

हेही वाचा -  पहिलाच प्रयोग; अकोल्यात साकारतेय चाईल्ड फ्रेंडली पोलिस ठाणे

शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी जागर मंचचे युवा सदस्य तथा शेतकरी पुत्र शाम मनतकार, अक्षय राऊत, कपील ढोके, शेखर साबळे, सौरभ गवई, पवन मंगळे, अमोल इंगोले, प्रतीक सुरवाळे, आकाश गवई, मो.रिहान, आकाश कवळे, कुणाल शिंदे, सारंग शिंदे उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com