Akola : दानपेटी फोडून रक्कम लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola crime news

Akola : दानपेटी फोडून रक्कम लंपास

वनोजा : मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा फाट्यावरील व बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गापासून जवळच असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटीवर अज्ञात चोरट्याने धनत्रयोदशीच्या रात्री हात साफ केल्याची घटना घडली. पोलिस यंत्रणेबाबत नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त होत असुन चोरट्यांना पोलीस यंत्रणेची भितीच राहीली नाही अशा प्रतिक्रिया भक्तांकडून ऐकावयास मिळत आहे.

हेही वाचा: Akola : आयुर्वेदिक उटण्याची विक्री करून ‘आनंद’ला आनंद

सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. अनेक जण मंदिरात देवाकडे सुख समृद्धी मागण्यासाठी जात असतात मात्र वाशिम जिल्ह्यातील आदर्श ग्राम वनोजा फाटा येथील संत गजानन महाराज मंदितात एका चोरट्याने दि. २३ रविवारी रात्री एक वाजताच्या सुमारास मंदिरात घुसून चोरट्याने हात साफ केला आहे. मंदिरातील पुजारी नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी मंदिराला कुलूप लावत असतात.

हेही वाचा: Akola : भाजप हा एकमेव पक्ष देशाला तारणारा

मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सुरक्षा भिंतीवरून मंदिरराच्या आत प्रवेश करून मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या मंदिर कार्यालयात झोपून असलेल्या चौकीदाराच्या खोलीला बाहेरून लावून घेत हत्याराच्या साह्याने मंदिराच्या दाराचे व दानपेटीचे कुलूप तोडून चोरट्याने हात साफ केला आहे.

हेही वाचा: Akola : सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारली!

पहाटेच्या ०५:३० च्या सुमारास मंदिराचे चौकीदार उठल्यावर मंदिर उघडण्यासाठी गेले असता. त्यावेळी मंदिराच्या दाराला कुलूप त्यांना दिसले नाही. त्यानंतर त्यांनी आत जाऊन पाहिले तर दानपेटीमधील पैसे चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत लगेच संस्थांचे अध्यक्ष यांना फोन करून माहिती दिली. दानपेटीत अंदाजे पाच हजारांवर रक्कम असल्याचे संस्थानचे अध्यक्ष रवींद्र राऊत यांनी सांगितले.