Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

Eknath Shinde Directs Municipal Commissioner to Hold Action : अकोल्यातील नजूल भूखंड क्रमांक ३३/१वरील रहिवासी व व्यावसायिकांवरील मनपाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी
Updated on: 

अकोला : शहरातील नजूल शीट क्रमांक ४० ए, नजूल भूखंड क्रमांक ३३/१ येथील रहिवासी व व्यावसायिकांवर महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा विशेष प्रभारी ललित नानासाहेब वानखडे आणि जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या पत्राची दखल घेत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दूरध्वनीवरून कारवाई न करण्याचे आणि हे प्रकरण आपल्यासमोर सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती शिवसेनेने दिली.

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी २४ सप्टेंबर रोजी संबंधित रहिवासी व व्यावसायिकांना नोटीस बजावत केवळ २४ तासांची मुदत दिली होती. अतिक्रमणाच्या कारणावरून जागा रिकामी करण्यासह पाडकामाची कारवाई करण्याचे निर्देश या नोटिशीत देण्यात आल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे संबंधित नागरिक व दुकानदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जागा पूर्वी खासगी मालकीची होती. सुमारे ९० वर्षांपूर्वी ती खासगी व्यक्तींना भाडेतत्त्वावर देण्यात आली होती.

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी
Mumbai Accident: 71 वर्षीय माजी खासदारानं दुचाकीला उडवलं, BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू तर पत्नी गंभीर; गुन्हा दाखल

येथे वास्तव्यास असलेले नागरिक आणि छोटे व्यावसायिक गेल्या ४० ते ५० वर्षांपासून नगर परिषद व महापालिकेकडे मालमत्ता कर भरत आहेत. दरम्यान, तत्कालीन नगरपालिकेच्या मागणीनुसार १९९६ मध्ये भूसंपादन अधिकाऱ्यांनी जागा अधिग्रहित केली. त्यानंतर ३० जून २०१७ रोजी महसूल विभागाने जागेचा ताबा महापालिकेला दिला.

मात्र, जागा अधिग्रहणाच्या वेळी किंवा त्यानंतर मूळ भाडेकरूंना पूर्वसूचना अथवा नोटीस देण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. अचानक पाडकामाची कारवाई झाल्यास सामान्य नागरिक व छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने कोणतीही घाईची कारवाई न करता संबंधितांची बाजू ऐकून घ्यावी आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी
Gold Rate Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त! दसऱ्याआधी खरेदीदारांना मोठा दिलासा; पाहा मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील भाव

यावेळी हरजीमल ओमकारमल, कन्हैयालाल जैन (जयप्रकाश जैन), महादेवराव हुरपडे, सुरेश मते, प्रदीप गंगावते, शांताराम मते, नवलकिशोर सराफ, आनंद अवशालकर, रामनिवास मुलचंद, महादेव छित्तरमल, वेणीचंद जैन, नरेंद्र कानीटकर, लिलाबाई धवने, राजेंद्र मुलचंद, गयाबाई इंगळे, भारतीबाई अनपढ, सुमित साठे, वंदना सुरेश जाधव आणि सुलोचना दिगंबर पवार यांच्यासह व्यापारी व नागरिक उपस्थित होते. अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com