esakal | १२ मोस्टवांटेड पोलिसांच्या जाळ्यात, शस्त्र जप्तीसह अनेक गुन्ह्यांची कबुली; सर्व आरोपी शहरातीलच
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: 12 most wanted police nets, confession of various crimes including seizure of arms

तालुक्यातील पिपळखुटा फाट्यावरील घडलेल्या दरोड्याच्या घटनेत स्थानिक गुन्हे शाखा वाशीम व मंगरुळपीर पोलिसांनी आरोपिंना जेरबंद करून त्यांचेकडून शस्त्रसाठ्यासह रोख रक्कम जप्त केली. जेरबंद केलेल्या आरोपिंची कसून चौकशी केली असता, कबुलीनंतर एकूण १२ गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना रविवारी (ता.२०) कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

१२ मोस्टवांटेड पोलिसांच्या जाळ्यात, शस्त्र जप्तीसह अनेक गुन्ह्यांची कबुली; सर्व आरोपी शहरातीलच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मंगरुळपीर (जि.वाशीम) ः तालुक्यातील पिपळखुटा फाट्यावरील घडलेल्या दरोड्याच्या घटनेत स्थानिक गुन्हे शाखा वाशीम व मंगरुळपीर पोलिसांनी आरोपिंना जेरबंद करून त्यांचेकडून शस्त्रसाठ्यासह रोख रक्कम जप्त केली. जेरबंद केलेल्या आरोपिंची कसून चौकशी केली असता, कबुलीनंतर एकूण १२ गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना रविवारी (ता.२०) कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


अज्ञात तीन अनोळखी इसमांनी अडत व्यापारी प्रभूसा गोईंसा डगवार यांचेकडून ता.१७ डिसेंबर रोजी सव्वा लाख रुपये असलेली पिशवी जबरीने हिसकावली व मोटरसायकलने मंगरुळपीरच्या दिशेने पळून गेले. अशा तक्रारीवरून मंगरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने ठाणेदारांनी गुन्ह्याची तत्काळ माहिती पोलिस अधीक्षक वसंत परदेसी, अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे यांना दिली.

परदेसी यांनी तत्काळ स्थानिक शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांना गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन तपासाचे आदेश दिले. शिवाजी ठाकरे व त्यांच्या पथकाने रात्रीच घटनास्थळ काठून तपासाची चक्रे फिरवली. आरोपीबाबत गोपनिय माहिती घेतली. गुन्ह्यातील आरोपी शहरातील महात्मा फुले चौकातील एका दुकानात बसलेला दिसला.

क्षणाचाही विलंब न करता आरोपी सागर जऊळकर याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्या कंबरेला मागील बाजूस देशी कट्टा मिळून आला. त्याला पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केली असता त्याने व त्याचे इतर साथीदार सुरेंद्र उर्फ बाळू बुधे, राहुल करवते, मुकेश पठाडे, सोनू उर्फ शाहरुख अहमद खान, संदीप जाधव यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपिंची पोलिसांनी बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी इतर साथिदारासह सवासनी रोड आणि पत्रकार कॉलनी मंगरुळपीर येथे आणखी गुन्हे केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात असलेल्या सहा आरोपिंना अटक करण्यात आली असून, त्यांचेकडून गुन्ह्यात जबरीने हिसकाविलेले सव्वा लाख रुपये व देशी बनावटीची पिस्तूल, दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तसेच सवासनी रोडवरील घटनेसंबंधात आरोपी सागर जऊळकर, सुरेंद्र उर्फ बाळु बुधे, राहुल करवते, सुमित बुधे, सैय्यद नासीर उर्फ सोनू, अब्दुल मतीन अब्दुल मन्नान यांचेवर या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्रकार कॉलनीतील घटनेत आरोपी सागर जऊळकर, सुरेंद्र उर्फ बाळू बुधे, राहुल करवते, मुकेश पठाडे, संदीप जाधव यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी तपासात अजून माहिती घेतली असता मोहम्मद फैजान रा.दिवानपुरा हा त्याचे घरी अवैधरित्या शस्त्र बाळगूण आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोहम्मद फैजान अब्दुल कुद्‍दुस याचे घराची झडती घेतली असता, अवैधरित्या बाळगलेली तलवार (किंमत तीन हजार रुपये) जप्त करण्यात आली. रफीक बैग रशिद बेग रा. दिवानपुरा हा त्याचे घरात देशी पिस्तूल बाळगूण आहे, या माहितीवरून त्याच्या घराची झडती घेतली असता, एक देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस (किंमत ७० हजार रुपये) मिळून आले.


या सर्व उपरोक्त पाच गुन्ह्यात आरोपी सागर जऊळकर, सुरेंद्र उर्फ बाळु बुधे, राहुल करवते, मुकेश पठाडे, सोणु उर्फ शाहरुख अहमद खान, संदीप जाधव, सुमित बुधे, सैय्यद नासीर उर्फ सोणु, अब्दुल मतीन अब्दुल मन्नान, मोहम्मद फैजान अब्दुल कुद्‍दुस, रफीक बैग रशिद बेग, अशा १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांचेकडून रोख रक्कम सव्वा लाख रुपये, दोन देशी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतूस, एक धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे.

अजूनही या आरोपीकडून गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. या तपासात पोलिस उपनिरीक्षक शब्बीर पठान, सपोनि तूशार जाधव, पीएसआय मंजूशा मोरे, पीएसआय भगवान गावंडे, सुनील पवार, अमोल इंगोले, राजेश राठोड, अश्‍विन जाधव, संतोष शेनकुडे, निलेश इंगळे, मो.परसुवाले, अमोल मुंदे, रवि वानखडे, सचिन शिंदे, सुमित चव्हाण, ज्ञानेश्‍वर राठोड हे होते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image