शेतात काम करून घरी आलेल्या सोळा वर्षीय मुलीला पळविले

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 25 November 2020

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम नंधाना येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिरपूर जैन (जि.वाशीम)  ः शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम नंधाना येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिरपूर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंधाना, तालुका रिसोड येथील एक १६ वर्षीय तरुणी २० नोव्हेंबर रोजी कुटुंबासोबत शेतात काम करून घरी आली होती.

हेही वाचा - प्रयोग फसला; 94 टक्के विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी ‘नो एन्ट्री’

ती घराबाहेर काही महिलांशी बोलत असताना गावातील बाळू चंद्रभान चतूर नामक युवक तेथे आला व त्याने सदर मुलीस फूस लावून पळवून नेले.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

या प्रकरणी मुलीच्या पालकांनी शिरपूर पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३६६ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास शिरपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय महाले करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: A 16-year-old girl who came home after working in a field was abducted