आणखी २० रुग्णांची भर; ४६३ रुग्णांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 22 October 2020

कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे बाधित रुग्णांच्या संख्येचा ग्राफ अकोला जिल्ह्यात हळूहळू कमी होत आहे. एकीकडे दिवसभरात १८५ चाचण्या झाल्या असताना त्यात २० बाधिक रुग्ण आढळले आहेत.

अकोला :  कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे बाधित रुग्णांच्या संख्येचा ग्राफ अकोला जिल्ह्यात हळूहळू कमी होत आहे. एकीकडे दिवसभरात १८५ चाचण्या झाल्या असताना त्यात २० बाधिक रुग्ण आढळले आहेत.

रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये मंगळवारी सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ८१४५ झाली असून, त्यापैकी ४६३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ४२०३६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४०९५६ फेरतपासणीचे २१३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ८६७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४१७७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ३५१८६ तर पॉझिटीव्ह अहवाल ८१४५ आहेत.

बुधवारी २० पॉझिटिव्ह अहवाल
बुधवारी दिवसभरात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १० महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आश्रयनगर येथील तीन, सिंधी कॅम्प व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभुळगाव जहागीर, उमरी, मलकापूर, पिंपळखुटा, डाबकी रोड, न्यू मलसूल कॉलनी, बाळापूर, गोरे अर्पाटमेन्ट, खडकी खदान व शिवर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन पुरुषांचा समावेश आहे. मणकर्णा प्लॉट येथील दोन जण व ताजीपूर येथील एक रहिवासी आहे.

१९ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जणांना, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून चार जण, कोविड केअर सेंटर येथून तीन जण, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण तर अवघते हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून एक अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाची स्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८१४५
- मृत- २६६
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४६३
- एकूण डिस्चार्ज - ७४१६

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 20 more patients added; 463 patients are undergoing treatment