रॅपिड ॲन्टीजनच्या 201 चाचण्या, 18 पॉझिटिव्ह

Akola News: 201 tests of Rapid Antigen, 18 positive
Akola News: 201 tests of Rapid Antigen, 18 positive
Updated on

अकोला  : कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात गुरुवारी (ता. २४) दिवसभरात २०१ चाचण्या झाल्या, त्यात १८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

अकोला ग्रामीण येथे ५१ चाचण्या झाल्या, त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोट येथे १४ चाचण्या झाल्या, त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

बाळापूर व पातूर येथे आज चाचण्या झाल्या नाहीत. बार्शीटाकळी येथे १४ चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेल्हारा येथे तीन चाचण्या झाल्या, त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मूर्तिजापूर येथे ५३ चाचण्या झाल्या,

त्यात ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाहीत. अकोला आयएमए येथे १५ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला.

४५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या, त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Urea Shortage Concerns Resurface as Farmers Spend Night Outside Fertilizer Shops
Akola child nutrition food safety incident
Rural Water & Sanitation Workers Await Pay for Months; Government Under Fire
Courage Beyond Life: Akola’s Brave Soldier Pravin Janjal Decorated with Kirti Chakra
Marathi News Esakal
www.esakal.com