esakal | अतिवृष्टीग्रस्तांसाठी हवे २५ कोटी, पहिल्या हप्त्याचे वाटप पूर्ण; दुसऱ्याची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: 25 crore needed for flood victims, first installment completed; Waiting for another

जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने पहिल्या हप्त्यांची मदत २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिली होती.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी हवे २५ कोटी, पहिल्या हप्त्याचे वाटप पूर्ण; दुसऱ्याची प्रतीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने पहिल्या हप्त्यांची मदत २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिली होती.

सदर मदत निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला २५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सदर मदत निधी मिळताच उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.


यावर्षी झालेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनसह, तूर, कपाशीला सुद्धा अति पावसाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे कपाशीचे बोंड काळे पडले. झाडांची पडझड, बगीचातील फळ गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा चांगलेच नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते.

त्याअंतर्गत जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान मदत निधीच्या पहिल्या हप्त्याचे २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले होते. सदर निधीचे विभाजन करुन तो तहसीलदारांच्या खात्यात वळती करण्यात आल्यानंतर प्राप्त निधी ३८ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यानंतर सुद्धा अद्याप अनेक शेतकरी मदतीची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांंना मदत देण्यासाठी प्रशासनाला २५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.


अशी आहे नुकसानग्रस्तांची माहिती
तालुका बाधित गाव शेतकरी
अकोला १८० ७१९६
बार्शीटाकळी १५९ ६९४९
अकोट १७५ १०९८९
तेल्हारा १०३ १९८२६
बाळापूर १०३ ९४३२
मूर्तिजापूर १६४ ५१६८
----------------------------------------
एकूण ९९९ ६८५७१

(संपादन - विवेक मेतकर)

loading image