दोन दिवसांत कोरोनाचे २६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

कोरोना संसर्ग तपासणीचे शनिवारी (ता. १४) व रविवारी (ता. १५) एकूण ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह तर ९३ अहवाल निगेटिव्ह आले.

अकोला  ः कोरोना संसर्ग तपासणीचे शनिवारी (ता. १४) व रविवारी (ता. १५) एकूण ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह तर ९३ अहवाल निगेटिव्ह आले.

गत आठ नऊ महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाने जिल्ह्यात थैमान घातलं आहे. कोरोनाचे रुग्ण महानगरानंतर गाव खेड्यात सुद्धा आढळले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या सप्टेंबर महिन्यात अधिक होती.

दरम्यान आता कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे शनिवारी (ता. १४) व रविवारी (ता. १५) एकूण ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह तर ९३ अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत कोरोनाचे रुग्ण घटल्याचे दिसून येत आहे.

शनिवारी (ता. १४) कोरोनाचे २३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. संबंधित रुग्ण जठारपेठ, अदलापूर ता. अकोट, केशव नगर, डाबकी रोड, केळकर हॉस्पीटल व हिरपूर ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरीत गोकुल कॉलनी, गोरक्षण रोड, शास्त्री नगर, धानोरी, वृंदावन नगर, नंदखेड, मूर्तिजापूर, तारफैल क्वॉटर, बाळापूर, विश्वकर्मा नगर व शंकर नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

रविवारी (ता. १५) कोरोनाचे तीन अहवाल पॉझिटिव्ह आले. संबंधित रुग्णांपैकी एक महिला मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे. त्यासह दोन पुरुषांचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला. ते रॉयल रिजेंसी महाजन प्लॉट व टीचर कॉलनी खडकी येथील रहिवासी आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 26 new corona patients tested positive in two days