नैसर्गिक आपत्ती बाधितांसाठी ३८.७७ लाख, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

सुगत खाडे 
Friday, 23 October 2020

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना मदत वाटप करण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला ३८ लाख ७७ हजार रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी तहसीलदारांना देण्यात आल्यामुळे त्याचे संंबंधित लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल.

अकोला  : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना मदत वाटप करण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला ३८ लाख ७७ हजार रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी तहसीलदारांना देण्यात आल्यामुळे त्याचे संंबंधित लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल.

वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांना प्रत्येक वर्षी फटका बसतो. याव्यतिरीक्त वीज पडून पशु व नागरिकांना जीव सुद्धा गमवावा लागतो. अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत देण्यात येते. या वर्षीच्या पावसाळ्यात सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसामुळे नुकसान झाले.

त्यामुळे शेतकऱ्यांसह आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्हा प्रशासनाला ३८ लाख ७७ हजार रुपयांचा निधी मिळाला असून, सदर निधीचे वाटप तहसीलदारांना करण्यात आले आहे. त्यामुळे पिडीतांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निधीचे असे केले वितरण
बाळापूर तालुक्यातील आपत्ती बाधितांसाठी २४ लाख रुपयांचा निधी तहसीलदारांना देण्यात आला आहे. अकोट, मूर्तिजापूर व पातूर तालुक्यातील बाधितांना मदत वाटप व्हावी यासाठी ४-४ लाख व अकोला तालुक्यातील बाधिकांसाठी ७७ हजार, बार्शीटाकळी व पातूर तालुक्यातील बाधितांसाठी १-१ लाख रुपयांच्या निधीसह ३८ लाख ७७ हजार रुपयांच्या निधीचे वाटप तहसीलदरांना करण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 38.77 lakh for natural calamities, relief to farmers