
कोरोना विषाणू कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच बुधवारी अकोला जिल्ह्यात रुग्ण संख्येचा आलेख एकाकी वाढल्याने प्रशासन व नागरिकांना धडकी भरली आहे.
अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच बुधवारी अकोला जिल्ह्यात रुग्ण संख्येचा आलेख एकाकी वाढल्याने प्रशासन व नागरिकांना धडकी भरली आहे. दिवसभरात तब्बल ८४४ रुग्णांचे कोविड चाचणी अहवाल प्राप्त झालेत. त्यात ७० पॉझिटिव्ह
आढळून असून, एकाचा संसर्गाचे मृत्यू झाला आहे. या शिवाय रॅपिड ॲटिजेन टेस्टमध्ये १८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गत २४ तासात अकोल्यात ८८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ही अलिकडच्या काही दोन आठवड्यांमधील सर्वाधिक रुग्ण संख्या ठरली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्याही १० हजारांकडे वाटचाल करीत आहे.
हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी
बुधवारी दिवसभरात ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी ३४ तर सायंकाळी ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापूर्वी ता. २४ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सकाळी जठारपेठ येथील पाच जण, प्रभात किड्स येथील तीन जण, कौलखेड, कुंभारी, अमाख्या प्लॉट व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लोहगड ता. बार्शीटाकळी, धाबा ता. बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर, अकोट रोड, हिंगणा रोड, विद्युत नगर, रिधोरा ता.बाळापूर, पत्रकार कॉलनी, खिरपूरी, लोहारा ता. बाळापूर, बंबर्डा ता. अकोट, मलकापूर रोड, दुर्गा चौक, बाळापूर, गोरक्षण रोड, किनखेडपूर्णा ता. अकोट व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
सायंकाळी सिंधी कॅम्प येथील आठ जण, कौलखेड येथील पाच जण, शंकर नगर व रणपिसे नगर येथील प्रत्येकी तीन जण, गोरक्षण रोड, पातूर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जीएमसी क्वॉटर, अकोट, जीएमसी, शिवर, शिवाजी नगर, शिर्ला अंधारे, आस्टूल, रतनलाल प्लॉट, डाबकी रोड, शिवाजी नगर व मलकापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
हेही वाचा - अकोला, वाशीम जिल्ह्यात बसविणार ‘डमी वॉर टँक
१३ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जण, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक जण, अशा एकूण १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पंचशीलनगरातील एकाचा मृत्यू
कोरोना संसर्गामुळे उपचार घेत असलेल्या एकाचा बुधवारी मृत्यू झाला. हा रुग्ण पंचशील नगर, सिव्हिल लाईन येथील ७० वर्षीय पुरुष आहे.तो ता. १८ नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
हेही वाचा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
५७७ रुग्णांवर उपचार सुरू
अकोला जिल्ह्यात आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ९२०८ असून, दहा हजार संख्येकडे वाटचाल सुरू आहे. त्यातील २८९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ८३४२ आहे. सद्यस्थितीत ५७७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)