esakal | दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला लुटले अन् 30 मिनिटांत केली आरोपीला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Accused arrested for robbing a truck carrying bottles of liquor in 30 minutes

खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरील कास्तगार ढाब्यापासून काही दूर अंतरावर दारूच्या बाटल्या घेवून जाणाऱ्या ट्रक चालकाला तीन आरोपींनी थांबवून त्याला मारहाण करून चार हजार रुपये लुटले होते.

दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला लुटले अन् 30 मिनिटांत केली आरोपीला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरील कास्तगार ढाब्यापासून काही दूर अंतरावर दारूच्या बाटल्या घेवून जाणाऱ्या ट्रक चालकाला तीन आरोपींनी थांबवून त्याला मारहाण करून चार हजार रुपये लुटले होते.

त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गावर गस्तीवर असलेल्या खदान पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटना स्थळ गाठून मुंबई अंधेरी येथील ट्रक चालक अशोक शामनारायण यादव याला माहिती विचारली. घटनेनंतर ज्या दिशेने आरोपी गेले होते,

त्या दिशेने धाव घेत मोटारसायकल क्र. एमएच ३० एजे १३४८ चा पाठलाग सुरू केला. घटनेनंतर गाडीवरून फरार होणाऱ्या आरोपींपैकी मोटारसायकल चालक अनिकेत गणेश गडवाल (वय २१, रा. ढोणे कॉलनी शिवर) याला पोलिसांनी अटक केली.

उर्वरित दोन आरोपी पोलिसांना येताना बगून गाडीवरून उडी मारून फरार झाले. हा कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक डी.सी. खंडेराव यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक चांभार, डीबी पथकाचे रवी डाबेराव, राजेंद्र तेलगोटे यांनी केली. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून शत्रही जप्त केले.

(संपादन - विवेक मेतकर)