सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्यावरून प्रशासन-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली!

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 7 November 2020

सुटीच्या दिवशी अर्थात शनिवारी (ता. ७) व रविवारी (ता. ७) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुरू ठेवण्याबाबत प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकमत झालेले नाही. सदर दोन्ही दिवशी कार्यालये सुरू ठेवण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) सर्व विभाग प्रमुखांना दिले हाेते.

अकोला :  सुटीच्या दिवशी अर्थात शनिवारी (ता. ७) व रविवारी (ता. ७) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुरू ठेवण्याबाबत प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकमत झालेले नाही. सदर दोन्ही दिवशी कार्यालये सुरू ठेवण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) सर्व विभाग प्रमुखांना दिले हाेते.

त्यावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनीयनने सुटीच्या दिवशी कामकाज करणे शक्य हाेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू व बंद ठेवण्यावरुन कर्मचारी संघटना व प्रशासनामध्ये लेटर वॉर रंगल्याचे दिसून आले.

शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) साैरभ कटियार यांनी खाते प्रमुख व गट विकास अधिकाऱ्यांना ५ नाेव्हेंबरला पत्र पाठविले.

यात लेखा आक्षेप, विभागीय आयुक्तांच्या निरीक्षण टिप्पणीतील अनुपालन १०० टक्के सादर करावयाचे असल्याने ७ व ८ नाेव्हेंबर (सुट्टीच्या दिवशी) राेजी कार्यालये सुरू ठेवण्यात यावे, असा उल्लेख आहे. मात्र या पत्रात ज्यांचे काम प्रलंबित आहेत, त्यांनाच उपराेक्त दाेन दिवशी बाेलावण्यात यावे, असा स्पष्ट उल्लेख नाही.

त्यामुळे सुट्टीच्या दिवशी सर्वच कर्मचाऱ्यांना यावे लागणार काय, आधी कामे पूर्ण केली असल्यासही आम्ही सुटीच्या दिवशी का यावे, हे वेळेत काम पूर्ण करणाऱ्यांना वेठीस धरण्यासारखे नाही काय, असे एक ना अनेक सवाल काही कर्मचाऱ्यांमधून उपस्थित करण्यात आले आहेत.

(संपादन  - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Administration-employees clashed over continuing office on holidays!