esakal | मंदीरे बंद, उघडले बार, उध्दवा, धुंद तुझे सरकार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: BJPs agitation in Maharashtra to open temples, criticizes Chief Minister Uddhav Thackeray

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज (ता.१३) भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच अकोला शहरातील राजराजेश्वर मंदीर तसेच बारा ज्योतिर्लिंग मंदीर येथे आंदोलन करण्यात आले. 

मंदीरे बंद, उघडले बार, उध्दवा, धुंद तुझे सरकार

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला: राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज (ता.१३) भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच अकोला शहरातील राजराजेश्वर मंदीर तसेच बारा ज्योतिर्लिंग मंदीर येथे आंदोलन करण्यात आले. 

मदिरालयांना (बार) परवानगी देणाऱ्या महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास अजून परवानगी दिलेली नाही. या विरोधात आज अकोला शहरात आंदोलन करण्यात आले तर मंदिर बंद उघडे बार, उध्दवा अजब तुझे सरकार, अशी टिका यावेळी करण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी भाजपा अध्यात्म आघाडीच्या वतीने राजराजेश्वर मंदिर व बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथे आंदोलन करण्यात आले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राज्यात मंदिरे बंद, बार सुरू हा अजब कारभार सुरू असून बारा बलुतेदार अठरापगड जाती संकटात आहेत  केवळ सोशल मीडियाच्या माध्यमाीतून व चर्चेत्या माध्यमातून घरी बसून सरकार चालवत आहे. या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीन ेराजराजेश्वर मंदिर व बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा,  महानगराध्यक्ष विजय अग्रमवाल, महापौर अर्चना मसने व अध्यात्म आघाडीचे पदाधिकारी उपोषणाा बसले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’, असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, राज्यात अद्याप मंदिरे बंद असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

१७ मार्चपासून  राज्यात मंदिर बंद असल्याने शिर्डीतील अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. रोज करोडो रुपयांची उलाढाल शिर्डीत होत असते. तर देश विदेशातून भाविक साईंच्या दर्शनाला येत असतात. शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल, हारफुलें, प्रसाद, मूर्त्यांची विक्रीचा व्यवसाय केला जातो. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय हे मंदिरावर अवलंबून आहेत. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या मागणीने शिर्डीत जोर धरला आहे. असे असले तरी भाजपच्या या मागणीला अकोलेकरांची साथ मिळाली नसल्याचे पहायला मिळाले. 

loading image
go to top