आणखी एकाचा मृत्यू; २० नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 23 October 2020

गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु मृत्यूचे सत्र मात्र कायम आहे. कोरोनामुळे गुरुवारी (ता. २२) सुद्धा एका रुग्णाचा मृत्यू झाला. संबंधित रुग्ण शिवर, अकोला येथील २७ वर्षीय पुरुष होता. त्याला २० ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अकोला :  गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु मृत्यूचे सत्र मात्र कायम आहे. कोरोनामुळे गुरुवारी (ता. २२) सुद्धा एका रुग्णाचा मृत्यू झाला. संबंधित रुग्ण शिवर, अकोला येथील २७ वर्षीय पुरुष होता. त्याला २० ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. २२) जिल्ह्यात ९२ अहवाल प्राप्त झाले. त्यात ७२ अहवाल निगेटिव्ह तर २० अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पाच महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर व गणेश नगर येथील प्रत्येकी तीन, तर उर्वरीत जैन मंदिर, रुख्मिणी नगर, जठारपेठ, मोठी उमरी, रामदासपेठ, बोरगांव मंजू, खांडला, शास्त्री नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी सुद्धा पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड, खिरपुरी ता. बाळापूर, गणेश नगर, वाडेगाव ता. बाळापूर व रामदासपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

१६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून गुरुवारी (ता. २२) १२ जणांना, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक तर हॉटेल रिजेंसी येथून तीन जणांना अशा एकूण १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८१७८
- मृत - २६७
- डिस्चार्ज - ७४३२
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४७९

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Another dies; 20 new positives