
कोरोना संसर्गामुळे सोमवारी (ता. १४) आणखी एका रुग्णाचा बळी गेला. याव्यतिरीक्त २१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३०४ झाली असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५२ झाली आहे.
अकोला : कोरोना संसर्गामुळे सोमवारी (ता. १४) आणखी एका रुग्णाचा बळी गेला. याव्यतिरीक्त २१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३०४ झाली असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५२ झाली आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. १४) जिल्ह्यात ९९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७८ अहवाल निगेटिव्ह तर २१ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा बळी सुद्धा गेला. संबंधित रुग्ण कबीर नगर, अकोला येथील ६२ वर्षीय महिला होती. तिला ९ डिसेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या व्यतिरीक्त पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये नऊ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. संबंधित रुग्ण राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित व्याळा ता. बाळापूर, राम नगर, मोठी उमरी, कौलखेड, डाबकी रोड, जीएमसी बॉईज हॉस्टेल, जवाहर नगर, गीता नगर, आकाशवाणी नगर, जठारपेठ, खडकी, आंबेडकर चौक व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. ९१ जणांना डिस्चार्ज
कोरोनाची सद्यस्थिती (संपादन - विवेक मेतकर) |
|||