
डाऊन सिड्रोम नावाच्या घातक आजाराने ग्रासलेल्या इंदूर निवासी ३५ वर्षीय मोनिका मासंद या गतिमंद हरहुन्नरी मुलीने आपल्या व्यंगावर मात करीत अनेक अभिनव कला आत्मसात करून आपल्या कलेने सर्वांना मोहित केले आहे.
अकोला : डाऊन सिड्रोम नावाच्या घातक आजाराने ग्रासलेल्या इंदूर निवासी ३५ वर्षीय मोनिका मासंद या गतिमंद हरहुन्नरी मुलीने आपल्या व्यंगावर मात करीत अनेक अभिनव कला आत्मसात करून आपल्या कलेने सर्वांना मोहित केले आहे.
मोनिकाने नुकतीच कलात्मक दीप निर्माण करण्याची कला प्राप्त केली. तिच्या या अभिनव कलेस प्रोत्साहन देत तिच्या हस्तकलेस उजाळा देण्यासाठी इनरव्हील क्वींसच्या संख्यानी मोनिका मासंदचे स्वनिर्मित दीप माळांनी दीपोतसव साजरा करून नवा आयाम प्रस्थापित केला.
३५ वर्षीय डाऊन सिड्रोम नावाच्या असाध्य आजाराने ग्रस्त मोनिका मासंद हस्तकला मध्ये पारंगत असून, ती योग कलेतही निपुण आहे. ती कोणतेही चित्र आपल्या हाताने बनवून त्यामध्ये जिवंतपणा आणते. तिच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत असते. या घातक व मतिमंदसारख्या आजारातही तिने न डगमगता खंबीरपणे आपल्या कलेने स्वविश्व निर्माण केले आहे.
तिला तिचे फोटोग्राफर वडील प्रकाश मासंद यांनी सातत्याने जीवनातं संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. याच निर्धाराने आपल्या व्यंगाची तमा न बाळगता मोनिकाने अनेक कला आत्मसात करून आपल्या व्यंगाच्या वर्गासमोर एक उदाहरण कायम केले.ती आएसएमआर व परिवार नावाच्या संस्था शी जुडून डाऊन सिड्रोम आजारग्रस्त समाजसाठी कार्य करीत आहे.
तिने एक वर्षांपासून हाताने दीप बनविण्याची कला आत्मसात केली आहे. तिच्या या अप्रतिम दीपांना दीपावलीत चांगली मागणी आली. आत्मनिर्भर साठी तिने केलेल्या या कलागुणांस इनरव्हील क्वीनच्या महिला संख्यानी सलाम करून तिच्याशी संवांद साधून तिच्या दिव्यांनी आपली दिवाळी साजरी केली.
इनरव्हील क्वींसच्या अध्यक्षा जागृती लोढिया, उपाध्यक्ष तेजल मेहता, सचिव स्नेहा चावला, कोषाध्यक्ष प्रेरणा थावरानी, आयएसओ अनुराधा अग्रवाल, सीसी खातेमा हिरानी, पीपी हिताली जगवानी, पीपी राखी मल्ली, सीसीसीसी पिंकी हिरानंदानी, दीपाली जसमतिया, केसर गगनानी, डॉ.पियूषा बागडे आदींनी तिने बनविलेल्या दिव्यांनी आपले घर उजळून तिच्या आत्मनिर्भर कलेस वंदन केले.
(संपादन - विवेक मेतकर)