बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डचा विचारला आटोपी, खात्यातून पैसे काढून महिलेची फसवणूक

सुगत खाडे  
Tuesday, 22 September 2020

बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डचा आटोपी विचारून फसवणूक झालेल्या एक महिलेचे पैसे परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. जुलै महिन्यात खात्यातून ऑनलाईन पैसे काढून महिलेची फसवणूक करण्यात आली होती. यासंबंधीची तक्रार मिळाल्यानंतर अकोला पोलिसांनी गुन्हाचा छळा लावण्यात यश मिळवले.

अकोला: बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डचा आटोपी विचारून फसवणूक झालेल्या एक महिलेचे पैसे परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. जुलै महिन्यात खात्यातून ऑनलाईन पैसे काढून महिलेची फसवणूक करण्यात आली होती. यासंबंधीची तक्रार मिळाल्यानंतर अकोला पोलिसांनी गुन्हाचा छळा लावण्यात यश मिळवले.

स्थानिक रहिवाशी शुभदा चंद्रकांत जोशी यांना १० जुलै २०२० रोजी घरी असताना सकाळी ११ वाजता अनोखळी मोबाईल क्रमांकावरुन एका व्यक्तीचा फोन आला होता. संबंधित अनोखळी व्यक्तीने शुभदा जोशी यांना मी बॅंकेतून बोलतो तुमचे डेबिट कार्ड आज बंद होईल. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्ही तुमच्या एटीएम कार्डातून पैसे काढू शकणार नाही, असे सांगितले. त्यावर जोशी यांनी अनोखळी व्यक्तीला संपूर्ण कार्डची माहिती दिली व ओटीपी सुद्धा सांगितला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे अनोळखी व्यक्तीने जोशी यांच्या बॅंक खात्यातून ४३ हजार ५०० रुपयांची रक्कम काढून घेतली व त्यांची फसवणूक केली. सदर प्रकारानंतर जोशी यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली होती. त्यावर सायबर पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तक्रारदाराला फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली.

ऑनलाईन फ्रॉड वाढतेय खबरदार!
सध्या इंटरनेटमुळे सर्व व्यवहार ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे वेळेची बचत होते व व्यवहार करणाऱ्यांला जास्त मेहनत सुद्धा करावी लागत नाही. परंतु ऑनलाईन व्यवहार करताना नागरिक सावधागीरी बाळगत नाहीत. त्याचा फायदा हॅकर घेतात व नागरिकांची फसवणूक करतात. ही बाब लक्षात घेवून अनोखळी मोबाईल क्रमांकावरुन येणारे कॉल व अनोखळी व्यक्तीला बॅक खात्याविषयी, क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्डची वैयक्तीक माहिती देवू नये व कोणतेही लिंक अथवा ॲप (अप्लिकेशन) पुढील व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे डाउनलोड करु नये. अशा प्रकारच्या फोन कॉल पासून सावध रहावे व फसवणूक टाळावी, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Atopy asks for ATM card saying he is talking from bank, woman cheated by withdrawing money from account