शुक्रवारपासून सलग तीन दिवस राहणार बॅंक बंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 December 2020

तुमची काही महत्त्वाची बँकेची कामं पेंडिग असतील तर तुम्हाला ती २५ तारखेच्या आत करून घ्यावी लागणार आहेत. कारण राज्याभरातील बँका सलग ३ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित सर्व कामं गुरुवारपर्यंतच उरकून घेणे आवश्यक आहे.  तीन दिवसांनंतर एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवेल. यामुळे आताच रोख रक्कम काढून घ्या. कारण तेच फायद्याचं ठरेल. 

अकोला: तुमची काही महत्त्वाची बँकेची कामं पेंडिग असतील तर तुम्हाला ती २५ तारखेच्या आत करून घ्यावी लागणार आहेत. कारण राज्याभरातील बँका सलग ३ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित सर्व कामं गुरुवारपर्यंतच उरकून घेणे आवश्यक आहे.  तीन दिवसांनंतर एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवेल. यामुळे आताच रोख रक्कम काढून घ्या. कारण तेच फायद्याचं ठरेल. 

या आठवड्यात सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नववर्ष साजरं करण्यासाठी कुठे बाहेरगावी जाण्याचा बेत असेल किंवा तुम्हाला रोखीच व्यवहार करायचे असतील तर ते गुरुवारपर्यंतच उरकून घ्यावे लागणार आहेत.

२५ डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी आणि २६,२७  डिसेंबर चौथा शनिवार, रविवार असल्याने बँका बंद राहतील. त्यामुळे या आठवड्यात सलग तीन दिवस बॅंकांना सुट्टी असणार आहे.

तसंच नवं वर्ष सुरु होताच १ जानेवारीपासून बँकांच्या नियमांमध्येही काही बदल होणार आहेत. त्यामुळे बॅकेशी संबंधित व्यवहार वेळेत पूर्ण करावे लागणार आहेत.

यासोबतच भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका सलग ९ दिवस बंद राहणार आहे. ही माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Bank will be closed for three days in a row from Friday