esakal | शेतीच्या वादातून मारहाण; एकाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Beatings over agricultural disputes, Risod

शेतीच्या वादातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता कवठा येथे घडली. रवि प्रल्हादराव सरनाईक असे मृतकाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रल्हादराव विठ्ठलराव सरनाईक यांची नावे गावाशेजारी सहा एकर शेती आहे.

शेतीच्या वादातून मारहाण; एकाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

रिसोड (जि.बुलडाणा) :  शेतीच्या वादातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता कवठा येथे घडली. रवि प्रल्हादराव सरनाईक असे मृतकाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रल्हादराव विठ्ठलराव सरनाईक यांची नावे गावाशेजारी सहा एकर शेती आहे.

त्यापैकी मृतक रवि व त्याची पत्नी अनिता यांना खाण्यासाठी म्हणून दीड एकर शेती दिली होती. त्या शेतीवर ते त्यांचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या शेजारी नारायण माणिकराव सरनाईक यांचे शेत आहे व ते फिर्यादी अनिताचे सासरे आहेत.

ही शेती त्यांचा मुलगा राजीव नारायणराव सरनाईक हे पाहतात. राजू सरनाईक हे मृतक व त्यांच्या पत्नीला व त्यांचा दीर संजय सरनाईक यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत असत. परंतु, एकमेकांचे नातेवाईक असल्याने याआधी रिपोर्ट दिला नसल्याचे फिर्यादीने सांगितले.

१९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड ते दोन वाजेदरम्यान अनिता व तिचे पती रवि सरनाईक घरी असताना राजू नारायण सरनाईक त्यांना विनाकारण शिवीगाळ करत होता. तो कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे शिवीगाळ करणे सुरू होते व शिवीगाळ करत असताना त्याने त्याचीच मोटरसायकल काठीने मोडतोड करून नुकसान केले व तुम्ही गाडीची तोडफोड केली असा तुमच्या नावे रिपोर्ट देतो असे म्हणाला.

त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने रवि सरनाईक याची कॉलर धरून त्यांना ओढत त्यांचे घरासमोर नेत थापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांचे कामावरील मजूर गणेश नामदेव सुंदर व गोपाल प्रकाश कोल्हे हे दोघे आले आणि त्यांनी सुद्धा मारहाण केली.

राजू सरनाईक म्हणाला की, हा शेतीचे कारणावरून नेहमी मला त्रास देतो याला आता आपण जीवाने मारून टाकू, असे म्हणून त्या तिघांनी रवि सरनाईक यांना मारहाण करून गंभीर जखमी केले.

फिर्यादी व इतर त्यांना सोडवण्यासाठी मध्ये गेले असता त्यांनाही मारहाण केली. त्यामध्ये मृतक रवि सरनाईक हा गंभीर जखमी झाला. अनिता सरनाईक व इतर नातेवाईकांनी त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे प्राथमिक उपचार करून वाशीमला पाठविण्यात आले.

वाशीम येथील डाळे हॉस्पिटलमध्ये पुन्हा प्राथमिक उपचार करून त्यांनी अकोला येथे रेफर केले. प्रकृती जास्त बिघडल्यामुळे अकोला न जाता वाशीम येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

मृतकाची पत्नी अनिता रवि सरनाईक यांनी दिलेल्या अशा जबानी रिपोर्टनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक मुंढे पुढील तपास करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)