अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीस सुरुवात

मनोज भिवगडे
Thursday, 3 September 2020

अकरावी विज्ञान प्रवेश हे केंद्रीय प्रवेश पध्दतीव्दारे आॕनलाईन पध्दतीने सुरू आहे. यावर्षी ८९५५ जागांसाठी एकूण ३७२५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३०११ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली होती. ता. ३१ ऑगस्टपर्यंत पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक होतो.

अकोला : अकरावी विज्ञान प्रवेश हे केंद्रीय प्रवेश पध्दतीव्दारे आॕनलाईन पध्दतीने सुरू आहे. यावर्षी ८९५५ जागांसाठी एकूण ३७२५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३०११ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली होती. ता. ३१ ऑगस्टपर्यंत पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक होतो.

त्यानुसार बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. तरीसुध्दा महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या जवळपास ३० टक्के जागा रिक्त आहेत. त्यानुसार प्रवेशाची दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोना विषाणू कोविड -१९ मुळे बरेच विद्यार्थी आॕनलाईन पध्दतीने आवेदन पत्र भरू शकले नाही. बरेच विद्यार्थ्यांनी कमी पर्याय निवडल्यामुळे त्यांना कुठेच प्रवेश मिळाला नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ता.२ सप्टेंबरपासून दूसऱ्या प्रवेश फेरीला सुरुवात होत आहे. जे विद्यार्थी दुसऱ्या फेरीकरिता प्रवेश अर्ज करू इच्छितात.

त्यासर्व विद्यार्थ्यांनी ता.७ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी २ ते ५ या वेळात भारत स्काऊट गाईड आॕफिस, वसंत स्टेडियम जवळ अकोला येथे प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल. विद्यार्थ्यांनीया संधीचा फायदा घेवून प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन प्रवेश समितीचे सचिव गजानन चौधरी यांनी केले आहे.
 
दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक
- प्रवेश अर्ज स्वीकारणेः २ ते ७ सप्टेंबर
- प्रवेश यादी जाहीर करणे ः १० सप्टेंबर
- प्रवेश निश्चित करणे ः ११ ते १४ सप्टेंबर
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News begins the second round of the eleventh entry