
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे गाेठ्यांसाठीचेही अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे. योजनेसाठी ३५ लाभार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी ११ लाभार्थ्यांना अद्याप अनुदानाची प्रतीक्षा आहे.
अकोला : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे गाेठ्यांसाठीचेही अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे. योजनेसाठी ३५ लाभार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी ११ लाभार्थ्यांना अद्याप अनुदानाची प्रतीक्षा आहे. पशुपालकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे गाेठ्यांसाठी अनुदान देण्याची याेजना काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. अनुदान तत्वावरील ही याेजना आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी पावणे चार महिन्यांचा कालावधी राहिला असून, निधी खर्चाचे नियाेजन गतीमान करणे आवश्यक आहे. त्यामुळे गाेठ्यासाठीचे अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात वळते करणे गरजेचे असून, यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी हाेत आहे. दरम्यान गाेठ्याच्या अनुदानसाठी २० लाखाची तरतूद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीने केली हाेती. त्यानुसार ३५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक लाभार्थ्याला ५६ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. अद्याप ११ लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. गाेठा पूर्ण झाल्यानंतर माेजमाप पुस्तिका, सीसी सादर करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पंचायत समितीस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. एमबी-सीसी प्राप्त झाल्यानंतर पडताळणीअंती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा हाेणार आहे. (संपादन - विवेक मेतकर) |
|||