esakal | महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी, भाजपचा आरोप; खामगावात शासनाच्या आदेशाची होळी
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: BJP accuses Mahavikas Aghadi government of being anti-farmer; Holi of government order in Khamgaon

केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेले नवे कृषीकायदे राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. तसा अध्यादेशही काढण्यात आला आहे. हा आदेश काढणारे महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत भाजपाच्या वतीने बुधवार ता.७ ऑक्टोबर रोजी येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत शेतकरी विरोधी अध्यादेशाची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी, भाजपचा आरोप; खामगावात शासनाच्या आदेशाची होळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

खामगाव (जि.बुलडाणा) ः केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेले नवे कृषीकायदे राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. तसा अध्यादेशही काढण्यात आला आहे.

हा आदेश काढणारे महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत भाजपाच्या वतीने बुधवार ता.७ ऑक्टोबर रोजी येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत शेतकरी विरोधी अध्यादेशाची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला.

आमदार आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात भाजपाच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी सरकारने कृषी कायदे न लागू करण्याच्या अध्यादेशाचे होळी करण्यात आली.

यावेळी भाजपचे किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, शरदचंद्र गायकी, रामदादा मोहिते, नगराध्यक्ष सौ. अनिताताई डवरे, संजय शिनगारे, राम मिश्रा, पवन गरड, न. प. सभापती, नगरसेवक, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, तालुका , शहराचे पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडी, विध्यार्धी आघाडी, किसान आघाडी व इतर आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,महाविकास आघाडी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)