esakal | भाजपचा टोला; शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला; सत्ताधारी गुंतले अंदोलनात
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: BJPs Tola; Farmers questions aside; The ruling party is involved in the movement

 कोरोना आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न ऐरणीवर असताना हे प्रश्न बाजुला ठेवून सत्ताधारी दिल्लीचा अंदोलनात गुंतले असल्याचा आरोप अकोला जिल्हा भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धपत्राकातून केला आहे.

भाजपचा टोला; शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला; सत्ताधारी गुंतले अंदोलनात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न ऐरणीवर असताना हे प्रश्न बाजुला ठेवून सत्ताधारी दिल्लीचा अंदोलनात गुंतले असल्याचा आरोप अकोला जिल्हा भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धपत्राकातून केला आहे.


नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही, विमा नाही, एवढेच नाही तर मुबल्क वीज नाही. खरिपाचा हंगाम पदरात न पडल्याने आर्थिक कंबरडे मोडले आहे.

मात्र हे प्रश्न राज्य सरकार बाजूला ठेवत आहे. यंदा चांगला पाउस झाला नद्या, नाले , धरणे खचाखच भरली; पण केवळ वीज वेळेवर मिळत नाही म्हणून नुकसान होत आहे. खर तर शेतीसाठी दिवशा विद्युत पुरवठा करण्याची गरज आहे.

रात्री वन्य प्राण्यांची भिती आणि सिंचन चांगले होवू शकत नाही. हा त्रास टाळण्यासाठी गरज आहे ती दिवशा वीज पुरवठा करण्याची. पण सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेळ मिळत नसल्याचा आरोप या पत्रकात केला आहे.

शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण
वर्तमान काळात राज्यातील शेतकऱ्यांना अनेक संकटला तोंड दयावे लागत आहे. राज्य सरकारची भूमिका शेतकऱ्यांचा बाजूने नाही. मात्र शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत नको त्या गोष्टीत राज्य सरकार गुंतले असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.


मोदी विरोधकांचे गंगेत हात धुन्याचा प्रकार
केंद्र सरकारने शेतकरी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना शेतीमालाचे स्वातंत्र्य मिळून दिल्याचा दावा भाजपने केला आहे. त्या कायद्याला विरोध म्हणून राजकीय हेतूने प्रेरित होऊन शेतकऱ्यांचे अंदोलन सुरू असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. राज्यात मोदी विरोधक सत्तेवर आहेत. ते वाहत्या गंगेत हात धुवून घेत असल्याचा आरोप भाजपने दिलेल्या प्रसिद्धीपत्राक केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image