घरकुलासाठी घेतली लाच, अकोला एसीबीची अकोटात कारवाई

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 9 December 2020

 ग्रामीण गृह निर्माण विभाग पंचायत समिती अकोट येथील अभियंता मंगेश सुधाकर वानखडे (२७) याला हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिंबंधक विभागाने अटक केली.
 

अकोला : ग्रामीण गृह निर्माण विभाग पंचायत समिती अकोट येथील अभियंता मंगेश सुधाकर वानखडे (२७) याला हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिंबंधक विभागाने अटक केली.

अकोट तालुक्यातील जऊळखेड बु. येथील ५७ वर्षीय लाभार्थ्याने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. मानधन तत्वावर असलेल्या अभियंत्याने दोन लाभार्थ्यांसाठी प्रती लाभार्थी ५०० रुपयांप्रमाणे हजार रुपयांची लाच मागितली होती.

एसबीने अकोट पंचायत समिती येथे सापडा रचून कंत्राटी अभियंत्याला अटक केली. अकोट पंचायत समितीअंतर्गत तक्रारदार यांचा पुतण्या व काका यांचे रमाई घरकुल योजनेचे २ टप्याचे प्रत्येकी ४५ हजार रुपये खात्यात जमा केल्यावरून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दोघांचे हजार रुपये लाचेची मागणी करून अकोट पंचायत समिती परिसरात स्वीकारली. एसबीने वानखडे याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Bribe taken for Gharkula, Akola ACBs action in Akota